#Chiplun:आ. शेखर निकम यांची राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना समन्वयक पदी नियुक्ती
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार शेखर निकम यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना समन्वयक (कोकण विभाग) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना दिले.
आ. निकम यांनी निवडून आल्यानंतर आजतागायत आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याबाबत त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे व गरजूंना मदत मिळवून दिली आहे. सामाजिक कामामध्ये अग्रेसर असताना त्यांनी आपल्या पक्षाच्या विचारांचे पालन करत पक्ष संघटना बळकट करण्याचे देखील काम केले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना समन्वयक (कोकण विभाग) पदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. याद्वारे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, पक्षाचे मान्यवर नेते व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून जिल्हास्तरावर भेटी व बैठकांचे नियोजन करणे, आपल्या पक्षाच्या विचारांचे व आपल्याला माहीत असलेले राज्यातील गाव पातळीपर्यंतचे कृषी पदवीधर पक्षाशी जोडण्याचे काम करून पक्ष संघटना बळकट व मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आदी जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.
Comments
Post a Comment