महादरबार न्यूज नेटवर्क -
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच समाजात सेवाभावाची जपणूक व्हावी या उद्देशाने विश्वनायक फाउंडेशन मित्र परिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा वाक्षेवाडी, जिल्हा परिषद शाळा कोकरे नगर आणि जिल्हा परिषद शाळा जवळा (ता. सांगोला) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शालेय नविन वर्ष आणि विश्वनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय (भाऊ) वाक्षे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला.
दिनांक २५ जून २०२६ रोजी झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले. तसेच संस्थापक अध्यक्ष मा. विजय शेठ वाक्षे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास सरपंच राजाराम वाक्षे,प्रा.शहाजी वाक्षे, राष्ट्रीय अध्यक्ष गणेश बुधे,पोलीस पाटील आप्पासाहेब मोटे,शिवाजी कोकरे माजी उपसरपंच,आबासाहेब गलंडे माजी उपसरपंच,सुखदेव बुधे पोलीस,दिलीप वाक्षे ग्रा.सदस्य,तातोबा (दादा) वाक्षे, ज्योतीराम वाक्षे शिक्षण समिती अध्यक्ष,विजय वाक्षे ग्रा.सदस्य, दिनेश कोकरे पोलिस,भानुदास वाक्षे, रघू शेठ वाक्षे,दादा वाघमोडे,श्रीपंत गलंडे, दत्ता भानुसे,मोहन मोटे,सीताराम वाक्षे,तुकाराम वाक्षे उपाध्यक्ष,ब्रम्हदेव बुधावले,ॲड.उदयराज वाक्षे सदस्य विश्वनायक फाउंडेशन,युवा नेते सतीश मुढे, विकास वाघमोडे, किरण मोटे, रावसाहेब वाघमोडे, अतुल वाक्षे, अर्थव भानुसे, ओमकार मोटे, सौ साऊबाई गलंडे, गोकुळा वाक्षे,उषा वाक्षे, सचिव विश्वनायक फाउंडेशन,सुरेखा मोटे,सुष्मिता वाक्षे, अश्विनी वाक्षे तसेच विश्वनायक फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा वाक्षेवाडी येथील प्रा. गणेश मोटे सर, प्रशांत कुटे सर,अंकुश बुधावले सर,शितल झाडबुके मॅडम,अंगणवाडी सेविका संगिता वाक्षे मॅडम, मदतनीस शांताबाई वाक्षे,
जिल्हा परिषद शाळा कोकरे नगर येथील प्रा नामदेव झरीवाड सर,श्रीम शिला बनसोडे मॅडम अंगणवाडी सेविका साऊबाई बुधे मदतनीस अर्चना बुधे
राजू जावीर व सैफा ऐवळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
या उपक्रमासाठी ॲड. (मुंबई हायकोर्ट) डॉ. संतोष देवडकर, प्रा. दत्ता वाक्षे, इंजिनिअर हेमंत वाक्षे, मेजर श्रावण वाक्षे, मेजर विनोद वाक्षे, वरिष्ठ सीआयडी अधिकारी नवनाथ वाक्षे, उद्योजक सुशांत वाक्षे, अगतराव वाक्षे सर आणि समाजसेवक कृष्णा बुरुगंले यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि समाजहितासाठी सातत्याने असे उपक्रम विश्वनायक फाउंडेशन राबवत आले आहे आणि पुढे ही करत राहिल असा निर्धार विश्वनायक फाउंडेशन मित्र परिवाराने व्यक्त केला.
0 Comments