Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वै. ह.भ.प. मनोहर महाराज भगत दिंडीचे नातेपुतेहून आळंदीकडे उत्साहात प्रस्थान

महादरबार न्यूज नेटवर्क - 
कैवल्य चक्रवर्ती सम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी, वै. ह.भ.प. मनोहर महाराज भगत नातेपुते यांच्या दिंडीचे नातेपुते येथून आळंदीकडे जाण्यासाठी बुधवार, दि. ८ जुलै रोजी सकाळी भक्तीभावाच्या उत्साहात प्रस्थान झाले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, भाजपा ज्येष्ठ नेते हनुमंतराव धालपे, बाबा बरडकर तसेच वारकरी भाविक आणि ग्रामस्थांच्या हस्ते दिंडीचे मनोभावे पूजन करण्यात आले. 

गेल्या २५ वर्षांपूर्वी वै. ह.भ.प. मनोहर महाराज भगत यांनी नातेपुते गावातून या दिंडीची सुरुवात केली. गेल्या वर्षी या दिंडीचा रौप्य महोत्सवी सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला असून, यंदा या दिंडीचे २६ वे वर्ष आहे.
केवळ पायी वारी न करता, या दिंडीच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देण्याचे मोठे कार्य केले जाते. गेल्या २५ वर्षांपासून अविरतपणे या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये 
कीर्तन, प्रवचन आणि भारुडाद्वारे संत परंपरेची शिकवण. वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार
स्वच्छता अभियान आणि पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, समता व बंधुता संदेश.
धर्मप्रचार तसेच समाजातील अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीतींवर प्रहार.
वै. ह.भ.प. मनोहर महाराज भगत यांनी सुरू केलेली दिंडी व प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्यासाठी श्रीकृष्ण महाराज भगत व श्रीहरी महाराज भगत हे अथक परिश्रम घेत असून, श्रीराम महाराज भगत हे दिंडीचे प्रमुख चालक आहेत.

दिंडीमध्ये नातेपुते परिसरासह खानदेश, जळगाव, पुणे, लोणंद, बारामती, अकलूज, माळशिरस, इंदापूर, कवठेमहांकाळ आदी भागातील सुमारे १५० हून अधिक भाविक दरवर्षीप्रमाणे सहभागी होतात.
दिंडीमध्ये सर्वधर्म समभाव या दिंडीमध्ये सामाजिक सलोख्याचे एक आगळेवेगळे दर्शन पाहायला मिळते. गेल्या वर्षांपासून नातेपुते येथील मुस्लिम समाजातील शबीर मुलाणी हे या दिंडीसाठी आपली ट्रक सेवा अखंडपणे आणि अत्यंत श्रद्धेने देत असून, त्यांनी 'सर्वधर्म समभाव' हा विचार कृतीतून सिद्ध केला आहे. केवळ भक्ती आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दरवर्षी ते आपली ही सेवा उपलब्ध करून देतात.
या दिंडीमध्ये विविध जाती-धर्माचे भाविक एकत्र येऊन विठू माऊलींच्या गजरात दंग होतात. या वारीच्या माध्यमातून माणसाला माणसाशी जोडणारा एक मोठा सोहळा हाच संदेश या दिंडीच्या माध्यमातून समाजाला दिला जातो.

नातेपुते व परिसरातील वारकरी भाविक, सर्व अन्नदाते, देणगीदार आणि हितचिंतक यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळेच ही दिंडी आज २५ वर्षे पूर्ण करून २६ व्या वर्षात दिमाखाने वाटचाल करत आहे.

दिंडीच्या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी चंद्रकांत धालपे, हेमंत उराडे, भाऊसाहेब काळे, सागर पोटे, भागवत कोडलकर, शबीर मुलाणी, देविदास भुजबळ, हनुमंत बोडरे, पोपट बोडरे, महेश एकळ, राजेंद्र बरडकर, तानाजी घोडके,माणिक महाराज इंगळे निलेश महाराज होळ यांच्यासह नातेपुते परिसरातील ग्रामस्थ आणि महिला भक्तांची  उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments