Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सेवाभावाचे दर्शन; विविध संस्थांचे वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम


महादरबार न्यूज नेटवर्क -

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त नातेपुते येथे विविध सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक संस्थांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी विविध सेवा उपक्रम राबविण्यात आले. आध्यात्मिक मार्गदर्शन, नाश्ता, पिण्याचे पाणी आणि बिस्कीट वाटप अशा सेवांमुळे हजारो वारकऱ्यांना दिलासा मिळाला.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, नातेपुते शाखेतर्फे वारकरी व भाविकांसाठी आध्यात्मिक सेवा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आध्यात्मिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना टोली (प्रसाद) वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे एक हजार भाविकांनी लाभ घेतला. नातेपुते केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी अलका बहन यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता देशमुख, सोना माता, ढोपे माता, बी.के. रिद्धी, सतीश भाई पद्मन, सतीश भाई साळुंखे, योगेश भाई पलंगे, तानाजी भाई ढोपे व बी.के. विश्वजीत देशमुख यांनी सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला.

याचप्रमाणे श्री दत्त प्रतिष्ठान, नातेपुतेतर्फे वारकरी बांधवांसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिष्ठानने वारकरी सेवेची परंपरा कायम राखत हजारो भाविकांना प्रेमाने सेवा दिली. या उपक्रमासाठी प्रकाश पदमन, शिवम उराडे, रवींद्र ठोंबरे, नंदकिशोर ढालपे, शक्ती पलंगे, संजय मामा वराडे, कैलास शेठ सोनवणे, बाळासाहेब राऊत, रवींद्र कोतमिरे, संजय चांगण, उमेश बरडकर, सूरज बावकर, रोहित भरते, अभिजीत पदमन, राहुल सोनवळ, दर्शन उराडे, अविनाश लिपारे, विशाल कुलकर्णी, विजय पिसे, अमित चांगण, सुमित चांगण, अभिजीत बेंद्रे, प्रमोद कुचेकर, राजेंद्र चांगण, राऊत यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी कोल्हापूरचे डेप्युटी कलेक्टर हरीश सुळ, नातेपुते नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सभासद व अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, डॉक्टर बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला, नातेपुते यांच्या वतीनेही वारकरी भाविकांसाठी बिस्कीट वाटपाचा सेवा उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापक नवनाथ बांगर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सेवाकार्यात सहभाग घेतला. या उपक्रमास नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाहुबली चकेश्वरा, व्हाइस चेअरमन संतोष काळे, सेक्रेटरी ॲड. शिवाजीराव पिसाळ तसेच सभापती महेश शेटे यांनी उपस्थित राहून सेवा कार्याला प्रोत्साहन दिले.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त नातेपुते येथे राबविण्यात आलेल्या या विविध सेवाभावी उपक्रमांमुळे वारकरी बांधवांना मोठा आधार मिळाला असून, "वारकरी सेवा हीच खरी ईश्वरसेवा" हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित झाला.

Post a Comment

0 Comments