#Chiplun तेऱ्ये बुरंबी सुतारवाडीतील ग्रामस्थांनी घेतली आमदार शेखर सर यांची भेट


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम यांची जनसंपर्क कार्यालय,सावर्डे येथे तेऱ्ये बुरंबी सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी भेट घेतली.
         
भेटी प्रसंगी वाडीतील समस्या ग्रामस्थांनी आमदार महोदय यांच्या कानावर घातल्या व त्या पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी दिले.
आमदार श्री.शेखर सर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आपला विकास शेखर सरांच्या माध्यमातूनच होऊ शकतो असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला.  
        
सुतारवाडी ग्रामस्थांना एकत्रित करण्यासाठी विशेष मेहनत V.J.NT सेलचे तालुका उपाध्यक्ष श्री.अजय साबळे यांनी घेऊन यांच्याच सहकार्याने आमदार महोदयांची भेट घेण्यात आली.

या प्रसंगी संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर,V.J.NT सेलचे तालुका उपाध्यक्ष अजय साबले,विनायक सुतार,ऋषिकेश सुतार,विशाल सुतार,प्रशांत सुतार,यशवंत कानसरे,विजय घवाळी,सदानंद सुतार,दीपक भूरवणे,सुनील बडद,दत्ताराम मिस्त्री,विष्णू मिस्त्री,प्रभाकर सुतार,नवनाथ कानसरे,चंद्रकांत सुतार,योगेश कानसरे,महादेव कानसरे,धनंजय कानसरे,सुरेश घवाळी,लवेश सुतार,रोहित सुतार,सुरज सुतार,उल्हास मिस्त्री,अनिकेत सुतार,नितीन सुतार,तेऱ्ये बुरंबी सुतारवाडीतील प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम