#Mumbai:धनगर समाजातील अनेक प्रलंबित प्रश्नाचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना राज माने पाटील यांचे निवेदन


महादरबार न्यूज नेटवर्क -
धनगर समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न घेऊन राज माने पाटील यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात राज माने पाटील यांनी असं म्हटलं आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील घुलेनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची बारव येथे भव्य अशी मुर्ती स्थापन करण्यात यावे व सुशोभीकरण करण्यात यावे, तसेच महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास पाठ्यपुस्तक मध्ये समाविष्ट करण्यात यावा, तसेच अहमदनगर चे नामकरण अहिल्यानगर त्वरित करण्यात यावे अशी संपुर्ण धनगर समाजाच्या वतीने नम्र विनंती केली,अशा  आशेचे निवेदन राज माने पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

यावेळी उपस्थित धनगर शक्ती संपादक आकाश पुजारी, युवा नेते सुरेश सुळ ,वैभव गोडगे हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत