#Pune वारकरी संप्रदायातील संतांचे अधिष्ठान प्रभावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वारकरी संप्रदाय, संत परंपरा, मराठी संस्कृतीचे वैभव
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
वारकरी संप्रदायातील संतांचे अधिष्ठान आणि योगदान हे राजकीय अधिष्ठाना पेक्षा खूप मोठे आणि प्रभावी आहे...महाराष्ट्र ही संत भूमी आहे... येथे संत परंपरा लाभली आहे... आपण संतांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. महाराष्ट्रातील संत परंपरेला दंडवत, वारकरी संप्रदाय व संत परंपरा ही या महाराष्ट्राचे मराठी संस्कृतीचे वैभव आहे... ते जतन करून वाढविण्याची गरज आहे... ते कार्य वारकरी संप्रदायाचे माध्यमातून आपण करत आहात त्यामुळे वारकरी संप्रदायाचे मनापासून अभिनंदन करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत कोयना विभाग वारकरी मंडळाचे वतीने वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांतिब्रह्म मारूती महाराज कुरेकर यांच्या ९३ व्या तसेच रामायणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूरकर यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन आणि वारकरी संत पूजन सोहळ्यात मारुती महाराज कुरेकर यांना शांतीब्रम्ह आणि रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संयोजक बाळकृष्ण महाराज शिंदे, आळंदी देवस्थानचे अध्यक्ष विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, मालक बाळासाहेब आरफळकर, देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, खजिनदार भालचंद्र नलावडे, भगवान पोखरकर, धनंजय पठारे, इरफान सय्यद, अक्षय जाधव, धनंजय पठारे यांचेसह राज्यातील विविध देवस्थानचे पदाधिकारी, संतमहंत , माजी नगराध्यक्ष,नगरसेवक, महाराज, फडकरी, दिंडी प्रमुख आदींसह वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे माध्यमातून गुरू शिष्यांचा वाढदिवस एकाच वेळी येणे खरोखर योगायोग आहे. मारुती महाराज कुरेकर यांचा तिथीने आणि रामराव महाराज ढोक यांचा वाढदिवस तारखे नुसार हा वाढदिवस आहे. या निमित्ताने येण्याचे भाग्य लाभले. वारकरी संप्रदायाला संपूर्ण जीवन समर्पित करणारे या राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा, सन्मार्गाची दिशा देणारा वारकरी संप्रदाय आहे. राजकीय अधिष्ठान पेक्षा सांप्रदायिक अधिष्ठान मोठं आहे. वारकरी संप्रदाय आणि वारकरी शिक्षण संस्था ही समाज घडवणारा कारखाना असल्याचे त्यांनी सांगत सुसंवाद साधत कार्य गौरव केले. नामस्मरणा मुळे चांगले विचार मनात येतात. चांगले कार्य करण्याची संधी यातून मिळते. वाईट हेतू दूर होहोते. मोह , माया, मत्सर या पासून कोसो दूर माणूस जातो असे सांगून संप्रदायाचे समाज प्रबोधन कार्याचा गौरव करीत राज्य शासनाचे योजनांची माहिती लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी यावेळी संप्रदायास आवाहन केले. असल्याचे विचार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे प्रांगणातील मोकळ्या जागेत वारकरी भवन, कीर्तन सभा मंडप, ग्रंथालय, वसतिगृह इमारत, संरक्षण भीत आदी विकास कामांचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते झाला. तत्पूर्वी मारुती महाराज कुरेकर यांना शांतीब्रम्ह आणि रामराव महाराज ढोक यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना आपल्या सरकारच्या दोन वर्षातील कार्याचा आढावा घेत लोकांचे कल्याणासाठी सरकार काम करीत आहे. सरकार लोक हितासाठी काम करीत असून शासनाने अनेक योजना लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी, लाडक्या बहिणीसाठी आणि आता लाडक्या भावासाठी हि योजना राबविली असून सर्व योजना मधून राज्यातील जनतेचे कल्याण साधण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याचे विकासाचे योजना या सर्व सामान्या लोकांना पर्यंत पोहोचविण्यासाठी आवाहन यावेळी त्यांनी केले. वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाचे कार्य करीत असून याच कार्यात राज्याच्या योजनांची हि माहिती लाभार्थ्याला पर्यंत नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन शिंद एयानी केले. त्यांनी आपल्या विकास कामांची माहिती देत फटकेबाजीत विरोधकांवर टीकेचा निशाणा साधत चांगल्या योजना आणि चांगले कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींचे कार्याचे कौतुक केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून राज्यात शांतिब्रह्म मारुती महाराज कुरेकर, रामराव महाराज ढोक यांचे कार्य प्रभावी आहे. याचा प्रत्यय दोन मिनिटे मार्गदर्शन करताना सर्वाना आला आहे. त्यांचे कार्य गौरव करीत त्यांनी अभिनंदन केले. आजचा या कार्यक्रमाचा दिवस आयुष्यातला आनंद देणारा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगत ते म्हणजे, संताचे पूजन करण्याचे भाग्य लाभणे यापेक्षा दुसरे भाग्य काय असते. राजकारणातील राजकीय अधिष्ठाना पेक्षा संतांचे अधिष्ठान प्रभावी आणि मोठे आहे. समाज घडवण्याचे कार्य करतात. धर्मवीर आनंद दिघे ही प्रत्येक हरिनाम सप्ताहास न चुकता जात असे. या त्यांचे कार्याची यावेळी त्यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले,अल्प दोन वर्षाचे काळात सुमारे ६०० शेवर निर्णय घेतले. मात्र हे सर्व निर्णय माझ्या लाडकी बहीण योजनेच्य निर्णयाखाली दबून गेले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. कोणतीही नवीन एखादी योजना लगेच सुरू होत नसते. त्यास मोठी मेहनत घ्यावी लागते. मी सामान्य घरातला मुलगा असल्याने आईची काटकसर पाहिलेला मी मुलगा आहे. लोक म्हणतात १५०० रुपयात विकत घेता का ? यातून एक प्रकारे लाच घेता का ? असं म्हणतात. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना १५०० रुपयांची काय किंमत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना अशा अनेक योजना आणल्या. २ वर्षात काय काय करायचे. एकनाथ शिंदेला थोडा तरी वेळ देणार का नाही असा सवाल करीत त्यांनी संवाद साधला. एकनाथ शिंदे खोटा बोलत नाही. बाळासाहेब ठाकरे सांगायचे शब्द देण्याआधी दहा वेळा विचार करा. त्यामुळे आम्ही दिलेला शब्द पाळतो. लाडकी बहिण योजनेस एक वर्षाची तरतूद केलेली आहे. ही ओवाळणी कायम मिळेल. आपले कडे कोणीही आला तर त्यांचे विनाशुल्क काम करी असल्याचे सांगितले. आपली एकच अपेक्षा आहे की, माझ्याकडे आलेला एकही माणूस खाली हात जाऊ नये. शपथ विधीला देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र होतो. तो देखील इतिहास आहे. असा इतिहास घडवण्यास ही
मोठं धाडस लागते असेही त्यांनी सांगितले. शेतकरी सन्मान योजना, एक रुपयात पीक विमा योजना, इंद्रायणी प्रदूषण मुक्त साठी उपाय योजना, महिलांना एस. टी. बस मध्ये सवलत अशा योजनाची माहिती देत जनजागृती करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
माऊली मंदिरात मुख्यमंत्री यांचे स्वागत
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात जाऊन पूजा करीत श्रींचे दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माऊलींची प्रतिमा भेट देत सत्कार करण्यात आला.
श्रींचे दर्शन घेत त्यांनी राज्याचे लोकहितार्थ साकडे घातले. ते म्हणाले, महाराष्ट्रात गणेश भकांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. गणरायाचे आगमन राज्याला सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. सांगत प्रार्थना केली आहे. राज्यातील शेतकरी यांचे वरील अरिष्ट दूर व्हावे, संकट दूर होवो, चांगला पाऊस पडत आहे. चांगली शेती होऊ द्या. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी सरकार शेतकरी बांधवांचे मागे उभे राहणार आहे. सर्वत्र गणेश उत्सवाचा आनंद आहे. राज्यात, देशात तसेच जे गणेश भक्त देशा बाहेर नोकरी, व्यवसाय निमित्त गेले आहेत. तिथेही गणेश भक्त आगळी वेगळी गणेशोत्सवाची परंपरा जपत गणेशोत्सवाचा आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी ग्रामस्थ व नगरपरिषदेच्या वतीने माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांचेसह विविध सेवाभावी संस्था आणि मान्यवरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बांधकाममंत्री दादा भुसे यांचा तसेच वारकरी संप्रदाय भूषण शांतिब्रह्म मारुती महाराज कुरेकर, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे वाढदिवसा निमित्त हृदयस्पर्शी वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते अनुक्रमे शांतिब्रम्ह आणि तुलसीदास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी संत पूजन आणि संदीपान महाराज शिंदे यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा झाली. याप्रसंगी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी शांतिब्रह्म मारुती महाराज कुरेकर, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी मनोगते व्यक्त करीत वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले.

Comments
Post a Comment