Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:श्रीकांत बाविस्कर यांची ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल प्रदेश उपाध्यक्षपदी निवड


 महादरबार न्यूज नेटवर्क -
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल महाराष्ट्र या नोंदणीकृत राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नातेपुते येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत उत्तम बाविस्कर यांची  सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनी निवड झाली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी पत्र देऊन बाविस्कर यांची निवड जाहीर केली श्रीकांत बाविस्कर हे गेल्या २५ वर्षापासून पत्रकार क्षेत्रात असून त्यांनी अनेक नामांकित दैनिकात पत्रकार म्हणून काम केले आहे आणि सध्याही करीत आहेत.

निवडीनंतर श्रीकांत बाविस्कर म्हणाले ए जी एफ सी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली  असून संघटनेच्या ध्येयधोरणानुसार सर्वांना बरोबर घेऊन संघटनेचे काम करणार आहे.

Post a Comment

0 Comments