#Yavat:कडेठाण येथे विद्यार्थ्यांचा संयुक्तरीत्या दिंडी सोहळा


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील कडेठाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कै. त्रिंबक दिवेकर विद्यालय यांनी एकत्रित करण्यात आला लहान विध्यार्थ्यांचा सुंदर असा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता,लहान विद्यार्थी श्री विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशात होते. पूर्ण गावात दिंडी  नेण्यात आली ग्रामस्थांनी मोठया आनंदाने व कौतुकाने या बालवारकऱ्यांचे स्वागत केले पूजन केले.

यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक सौ शुभांगी दिवेकर व त्यांचा शिक्षक वर्ग यांनी  व्यवस्थापन केले होते त्यांना सहकार्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी केले होते आणि कै. त्रिंबक दिवेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जनक वरपे सर व त्यांचा शिक्षक वर्ग उपस्थित होता, सर्व शिक्षकांनी उत्तम असे दिंडीचे नियोजन केले होते. संजय वाबळे सर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी सरपंच सौं. सोनाली ताई नराळे व उपसरपंच अनिल धावडे, ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश शिपलकर, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष सौ निपुल यादव,सदस्या दीपा दिवेकर व सर्व  सदस्य व  ग्रामस्थ उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम