महादरबार न्यूज नेटवर्क -
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नातेपुते येथे आले असता पालखी सोहळा दरम्यान नातेपुते येथील
मामाश्री प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपत नातेपुते नगरीं मध्ये येणाऱ्या वारकरी भक्तांना 3 टन केळी व 2 हजार लस्सी चे मोफत वाटप करण्यात आले.
मामाश्री प्रतिष्ठाण हे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.
यावेळी मामाश्री प्रतिष्ठाण संस्थेचे अध्यक्ष तेजस पाटील उपाध्यक्ष धनाजी पांढरे तशेच नगरसेवक अतुल बावकर, दादासाहेब लाळगे, विनोद शेंडगे, राहुल शेंडगे, अमोल शेंडगे, बापू शेंडगे, नाना सोरटे, आकाश भुसारे, संजय शेंडगे, उपस्थित होते.
मामाश्री प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचे नातेपुते सह परिसरातून कौतुक केले जात आहे.
0 Comments