Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष पुजाताई निकम यांच्या मार्फत सावर्डे ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनेचे मार्गदर्शन


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण तालुक्यातील सावर्डे ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजना संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सावर्डे पंचक्रोशी येथील ग्रामस्थांना, चिपळूण पंचायत समिती माजी सभापती, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष पूजाताई निकम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील दिलेल्या योजना संदर्भात माहिती देण्यात आली. लेक लाडकी योजना,बालसंगोपन योजना, एकला महिला योजना,स्मार्ट अंगणवाडी योजना डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, अंगणवाडी कर्मचारी पेन्शन योजना, अंगणवाडी केंद्र दत्तक धोरण योजना, कंटेनर अंगणवाडी योजना, बेबी केअर किट योजना.
आश्या अनेक शासकीय योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थित आरोग्य सहाय्यक - सुनील जानवलकर, सी.एच.ओ - सालवड मॅडम, आरोग्य सेविका - दिपाली जाधव मॅडम व सावर्डे ग्रामपंचायत सरपंच समीक्षा बागवे मॅडम, वर्षा खानविलकर मॅडम तसेच व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments