#Natepute:महिला सक्षमपणे संस्था चालवून यश मिळवतील- राम सातपुते


महादरबार न्यूज नेटवर्क -   
प्रामाणिकपणे काम केल्यास यश मिळते,हि पतसंस्था महीला चालवत असल्यामूळे म महीलांना आर्थीक व्यवहार चांगले जमतात त्यामूळे सस्थेला काही अडचण येणार नाही असे मत आ.राम सातपुते यांनी व्यक्त केले.ते येथील अनामिका महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसस्थेच्या उद्दघाटन प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धैर्यशील मोहीते पाटील होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष धैर्यशील मोहीते पाटील म्हणाले.कर्ज देतेवेळी काळजी घ्या.कर्जदार कर्ज घेताना खूप गोड बोलतो.पण फेडतेवेळी तोंडही दाखवत नाही.कोणालाही कर्ज देताना घरातील सर्वासमक्ष कर्ज द्या.त्यामूळे कर्ज फेडताना अडचण येणार नाही.
    
प्रारंभी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे संस्थापक नवनाथ जाधव यांनी केले.प्रमूख पाहूण्यांच्या हस्ते अनामिका पतसंस्थेचे उद्दघाटन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी पतसंस्थेचे संस्थापक नवनाथ जाधव यांचा वाढदिवस असल्याने केक कापून त्यांना सर्वानी शूभेच्छा दिल्या.
     
कार्यक्रमास आमदार.राम सातपुते,भाजपाचे संघटक धैर्यशील मोहीते पाटील,माळशिरस तालूका भाजप अध्यक्ष मामासाहेब पांढरे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमूख,पचायत समिती सदस्य माऊली पाटील,राष्ट्रवादी काग्रेस प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप,हर्षदा देशमूख,मामाश्री पतसस्थेचे व्हा.चेअरमन रणजित काळे.जि.प.सदस्या रूतूजाताई मोरे,अनामिका पतसंसस्थेच्या चेअरमन प्रियांका जाधव,व्हा चेअरमन  रूपाली पाटील,,सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन रणविर देशमूख,अर्जून जठार,अस्लम काझी,प्रदिप जगदाळे,सूधिर देशमूख,अमर जगताप,अमर जगदाळे,दत्ता मगर,आप्पासाहेब भांड,बाबा बोडरे,संतोष वाघमोडे,रोहीत शेटे,किशोर सूळ,राजेंद्र पांढरे,दिलीप जाधव,सूरज जाधव,नंदू लांडगे,मोहीत जाधव,दयानंद महाडिक आदि मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूञसंचालन सदिप जाधव यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम