Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:कारुंडे येथिल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला प्रा. लक्ष्मण हाके यांचे अभिवादन


महादरबार न्यूज नेटवर्क -   
काही दिवसांपूर्वी कारुंडे बंगला येथे काही अज्ञाताकडुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती.त्यानंतर कारुंडे पंचक्रोशीतील धनगर समाजात आनंदाचे आणि भावनेचे प्रचंड वातावरण निर्माण झाले होते पण नातेपुते पोलिस प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांनी कारुंडे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना वेळीअवेळी नातेपुते पोलिस ठाण्यात बोलावून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत असून काही जणांवर  गुन्हेही दाखल झाले आहेत. त्याच अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य तथा शिवसेना प्रवक्ते मा. प्रा. लक्ष्मण हाके सर यांनी व्यक्तीश:भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि समस्त गावकऱ्यांना आधार देऊन येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज तूमच्या पाठीमागे खंबीर उभा असेल अशी ग्वाही दिली.
यावेळी कारुंडे गावच्या वतीने हाके सरांचं ढोल ताशा आणि तुतारीच्या निनादात जलोशात स्वागत करण्यात आले.
    
यावेळी गावचे सरपंच सौ नामदास,उपसरपंच सुर्यकांत पाटील,माजी चेअरमन आणि जेष्ठ नेते श्री सुभाष पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री विजय रुपनवर, ग्रामपंचायत सदस्य महेश थिटे,संजय पवार, गणेश गायकवाड,माजी ग्रामपंचायत सदस्य  भारत नामदास, जेष्ठ नेते महादेव पाटील,सुभास सयाप्पा पाटील, युवानेते तुषार पाटील, यादवराव पाटील, अनंता माने,अनिल साळुंखे,अभी पाटील, विलास पाटील, रणजित रुपनवर इंद्रजित रुपनवर ,अजित पाटील, महेश रुपनवर अजित रुपनवर ,युवासैनिक किशन, कन्हैया विजय रुपनवर,बंटी रुपनवर, ओमकार जाधव व असंख्य गावकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments