#Chiplun संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे रांबाडेवाडी (मधलीआळी) ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( अजित पवार गट) पक्ष प्रवेश
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे येथील रांबाडेवाडी (मधलीआळी) ग्रामस्थांनी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर व गावातील व वाडीतील झालेल्या विकास कामांवर प्रेरीत होवून राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहिर प्रवेश केला.
आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून आपण माझ्यावर विश्वास ठेवून आज माझ्या सोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला कोणत्याही प्रकारची तडा जाणार नाही व कायमस्वरुपी अडीअडचणींमध्ये आपल्या सोबत राहून आपला योग्य तो सन्मान पक्षामध्ये केला जाईल असे सांगितले.
प्रवेशकर्त्यांमधे वायंगणे रांबाडेवाडी (मधलीआळी) स्थानिक ग्रामस्थ, महिला व मुंबई मंडळाचे पदाधिकारी गोपाळ रांबाडे, अनंत रांबाडे, गंगाराम रांबाडे, मंगेश रांबाडे, यशवंत रांबाडे, सुनिल रांबाडे, प्रमोद रांबाडे, दत्ताराम रांबाडे, नामदेव रांबाडे, चंद्रसेन रांबाडे, सुरेश रांबाडे, दत्ताराम रांबाडे, शांताराम रांबाडे, संजय रांबाडे, रुपेश रांबाडे, हेमंत रांबाडे, वसंत रांबाडे, तुकाराम रांबाडे, सचिन रांबाडे, रुपाली रांबाडे, ज्योती रांबाडे, सुष्मा रांबाडे, निर्जला रांबाडे, वेदिका रांबाडे, मिनाक्षी रांबाडे, जयश्री रांबाडे, निता रांबाडे, स्नेहा रांबाडे, सोनाली रांबाडे, जयवंती रांबाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.
प्रवेशाप्रसंगी किरडुवे गावचे माजी सरपंच प्रफुल्ल बाईत, वायंगणे उपसरपंच पर्शुराम घडशी, आंबव सरपंच शेखर उकार्डे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment