Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras किरण रायझुबे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पाच पिंपळा ता. परांडा
येथील किरण रायझुबे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.


त्यांनी या परीक्षेमध्ये राज्यात आठवा क्रमांक मिळविला  आहे तसेच एस.बी.सी कॅटेगरीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा लोंढे वस्ती कारुंडे ,माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण श्री नागेश विद्यालय जामखेड, कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज शेळवे पंढरपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरींग पुर्ण झाले.

त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




Post a Comment

0 Comments