Hot Posts

#Natepute सतीश सपकाळ यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासकीय समितीच्या सदस्यपदी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेली "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना"या  योजनेचा लाभ सर्वांना मिळावा या साठी शासनाच्या वतीने तालुका स्तरीय कमिटी स्थापन केली आहे.माळशिरस तालुक्याच्या कमिटीवर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सतीश सपकाळ यांची माळशिरस तालुका सदस्यपदी निवड करण्यात आली.

ही निवड सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व घटकांच्या लोकांनपर्यंत महायुतीच्या सरकारने ही योजना लागू केली आहे.जास्तीत जास्त गोरगरीबांनपर्यंत ही योजना पोहचवण्याचे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री लाडकी बहीण  योजनेचे तालुका सदस्य सतीश सपकाळ यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments