Posts

Showing posts from November, 2024

#Morochi २१ वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज च्या मोरजाई विद्यालय मोरोची येथील २००३ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर चा कार्यक्रम ३ नोव्हेंबर रोजी पार पडला. यावेळी या बॅचला शिकवणाऱ्या सर्व सन्माननीय गुरुवर्य शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या बॅचचे कित्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी सरकारी व खाजगी नोकरीला आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून आपापले संसार सुखाने करत असताना कधीतरी एकत्र यावं भेटावं या उद्देशाने हा स्नेह मेळावा ठेवण्यात आला होता. यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यामध्ये आनंदाचे वातावरण होते पुन्हा नव्या भेटीच्या ओढीने प्रत्येक जण गतकाळातल्या आठवणींना उजाळा देत होते. अतिशय कष्टाने मेहनतीने व संघर्षाने पार करत असलेली आयुष्याची लढाई हे विद्यार्थी करत होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा एक संघ देखील तयार करण्यात आला आहे. आपल्या सोबत उपस्थित नसणाऱ्या व काळाच्या ओघाने ज्यांचा मृत्यू झाला अशा माजी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर यांनी सहकार्य केले.

#Yavat भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ चालूच बोरीऐंदी येथील कार्यकर्त्यांचा आमदार राहुल कुल यांच्या उपस्थित प्रवेश

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील बोरीऐंदी या गावातील युवकांनी आणि जेष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार राहुल कुल यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवू असा निर्धार यावेळी युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विशाल झुरंगे अमोल शेलार, संचालक बोरीऐंदी सोसायटी प्रतीक गायकवाड, शुभम गायकवाड, शशिकांत झुरंगे, ऋत्विक झुरंगे, मारुती झुरंगे, स्वप्निल झुरंगे, योगेश गायकवाड, सागर गायकवाड, माणिक भोसेकर, कैलास काळे, गणेश पवार, सौरभ गायकवाड, तेजस गायकवाड, राकेश गायकवाड, दत्तात्रय फराटे, प्रफुल गायकवाड, नाना गायकवाड, शहाजी शेलार इत्यादी कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून राहुल कुल यांना बोरीऐंदी गावातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी केला आहे. गेल्या महिन्याभरात आमदार राहुल कुल यांना मिळणारा पाठिंबा पाहता राहुल कुल हे मोठ्या मताधिक्याने दौंड विधानसभेतून विजयी होतील अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागले .

#Chiplun राष्ट्रवादीचे (अजित पवार गट)स्टार प्रचारक सिने अभिनेते भाऊ कदमांच्या देवरूखातील रोड शो उस्फुर्त प्रतिसाद

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात महायुतीकडून  राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शेखर निकम हे  पुन्हा निवडणुक रिंगणात आहेत.   चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक सिने अभिनेते भाऊ कदम यांच्या उपस्थितीत देवरुख शहरातील रोड शो प्रचार रॅली ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरातील शिवाजी महाराज चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय येथून रॅलीला सुरूवात झाली. यावेळी आघाडीचे उमेदवार शेखर निकम यांचेसह आघाडीचे अनेक नेते  उपस्थित होते शिवाजी महाराज चौक- बसस्थानक - बाजारपेठ मार्गे सोळजाई देवी मंदिर अशी प्रचाररॅली काढण्यात आली. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बसस्थानक ते बाजारपेठ या मार्गावर काही काळ ट्रॅफिक जाम झाले होते.. या रॅलीत महीलावर्गाची उपस्थित लक्षणीय होती.           या रॅलीवेळी  राष्ट्रवादीचे हनिफ हरचिरकर, पंकज पुसाळकर, बाळु ढवळे,दुर्वा वेल्हाळ. प्रफुल भुवड. पंकज पुसाळकर भाजपाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, संतोष केदारी,

#Bhor प्रभोलनांना बळी न पडता विकासाला साथ द्या - संग्राम थोपटे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशी तालुक्यातील काशिंग, हाडशी, भालगुडी, वाळेण, कोळवण, डोंगरगाव, होतले, साठेसाई, नांदगाव, चिखलगाव, नाणेगाव, कुळे, दाखणे, चाले, मुगावडे, सावरगाव, करमोळी, दारवली, अंबटवेट, भरे, लवळे, नांदे या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला. यावेळी महादेवआण्णा कोंढरे, माऊली शिंदे, सचिन खैरे, गंगाराम मातेरे, भानुदास पानसरे, तुकाराम आबा टेमघरे, शिवाजी जांभुळकर, अविनाश बलकवडे, रामदास साठे, आंनदा आखाडे, लक्ष्मण आप्पा ठोंबरे, राम गायकवाड, ज्ञानेश्वर डफळ, सविताताई दगडे, सुरेखाताई तोंडे, दिपालीताई कोकरे, स्वातीताई ढमाले, निकिताताई सणस, गौरीताई भारतवंश यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.   यावेळी बोलताना ते म्हणाले की या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने प्रमुख असलेले रस्ते पौड- कोळवण - काशिंग - फागणे धरण रस्ता व वळकी नदीवरील मोठया पूलाचे काम करणे

#Bhor भोर विधानसभा मतदारसंघात इतिहास घडविण्याची संधी - प्रवीण तरडे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विचार, पार्टी पेक्षा काम करणारा माणूस महत्त्वाचा आहे.इतिहास घडविणारे तालुक्याला भोर विधानसभा मतदारसंघात इतिहास  घडविण्याची संधी येत्या २० तारखेला किरण दगडे पाटील यांच्या रुपाने आली आहे.जनसामान्यांच्या जीवनात गोडवा आणणारी किटली हे चिन्ह असून या चिन्हापुढील बटन दाबून इतिहास घडविणारे साक्षीदार व्हा असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात केले.      तत्पूर्वी शपथ भूमी किल्ले रायरेश्वरावरील स्वयंभू शिवमंदिरात प्रचाराचा शुभारंभ केला. शिवाजी विद्यालयाच्या क्रिडागंणावर तरडे पुढे म्हणाले की अपक्ष किरण दगडे पाटील यांना निवडून देवून २४ नोव्हेंबरला याच मैदानावर परत जमू आमदार किरण दगडे पाटलाच्या विजयी मिरवणुकीसाठी आणि तो चमत्कार भोर वेल्हा मुळशीत घडविणारे आपण आहात.मुळशीतील  प्रत्येक गावागावात दगडे पाटलांसाठी  माझा लहान भाऊ म्हणून मी त्याच्यासाठी फिरणार आहे.         किरण दगडे पाटील काय आहे हे एकदा पुण्यामध्ये येऊन कोथरूडमध्ये फिरा बावधन मध्ये फिरा  तिथल्या झोपडपट्ट्या मधल्या प्रत्येक गरीब बाईला जाऊन विचारा किरण दग

#Bhor कार्यकर्ता माझा श्वास - कुलदीप कोंडे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भोलावडे (ता.भोर) येथील राजा रघुनाथ विद्यालयाच्या भव्य मैदानावर कुलदीप कोंडे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला . ही निवडणूक लढवायची ही गेल्या पाच वर्षांपूर्वी ठरवलेलं होतं.मी या ठिकाणी जनतेच्या आशिर्वादाने निवडणूक लढतोय. भोरच्या विकासासाठी मित्रांनो येणाऱ्या पाच वर्षांमध्ये किमान ५० हजार तरुणांना नोकऱ्या मिळतील अशा पद्धतीचा आम्ही काम करून  दाखवू. पन्नास हजार तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल तसेच भोर तालुका, वेल्हा तालुका  कचरा मुक्त केल्याशिवाय राहणार नाही पर्यावरण संतुलन करीता काम करणार आहे. पाच वर्षांमध्ये जर तालुक्याचा कायापालट केला नाही तर पुन्हा आपल्या समोर  मत मागायला उभा राहणार नाही. सर्वसामान्य गोरगरिबाच्या कार्यकर्त्याकडे केवळ आणि केवळ फक्त पैसे नाहीत म्हणून या ठिकाणी स्थानिकांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आपल्याला तिकिट नाकारल. माझ्याजवळ पैसे नसले तरीसुद्धा ही समोर बसलेली जनता ही माझी संपत्ती आहे ह्या संपत्तीला बाजूला सोडून कधी मी जाणार नाही. माझा कार्यकर्ता हा माझा श्वास आहे माझा कार्यकर्ता ही माझी ताकद आहे त्याला हाताच्या फोडासारखा सांभ

#Bhor मुळशी तालुक्याची जनता सदैव माझ्या सोबत - संग्राम थोपटे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशी तालुक्यातील कातवडी, डावजे, कोंढुर, जातेडे, मुठा, आंदगाव, खारावडे, कोळावडे, लव्हार्डे, लवासा सिटी, भोडे, वातुंडे, वांजळे, माळेगाव, मारणेवाडी, उरावडे, बोतरवाडी, पिरंगुट, भुकूम, भुगांव या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले  या भागातील मुठा ते मुळशी तालुका हद्दी पर्यंतचा रस्ता यासाठी १ कोटी, वांजळे येथे ब्रीज बांधणे ६ कोटी, पूरहानी कार्यक्रमांतर्गत लवासा सिटी रस्ता १० कोटी, भोईनी रस्ता करणे १७ कोटी त्याचबरोबर पानशेत ते लावासा सिटी रस्ता ४ कोटी, पडळघरवाडी येथे संरक्षण भिंत बांधणे ६ कोटी, डावजे चोरघे वस्ती रस्ता, लव्हर्डे - वेगरेवाडी- धनवेवस्ती रस्ता, भोडे सपकाळवस्ती रस्ता, आंदगाव -गुजरवाडी रस्ता, आंदगाव- लोहारवाडी रस्ता, माळेगाव -शेडगेवाडी अंतर्गत गटर, हनुमानमंदिर सभामंडप त्यांचबरोबर पाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते अशी प्रत्येक गावातील आमदार स्थानिक निधी, डोंगरी विकास कार्यक्रम

#Chiplun महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांना गत निवडणुकीपेक्षा यावेळी दीडपट मताधिक्य मिळेल- ना. उदय सामंत

Image
महायुतीने पोफळी येथून फुंकले निवडणुकीचे रणशिंग महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव तुम्ही केलेली विकास कामे व शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांची साथ यामुळे मागील निवडणुकीपेक्षा यावेळी दीडपट जास्त मताधिक्य असेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ आयोजित पोफळी येथील सभेत व्यक्त केला. या सभेच्या माध्यमातून पोफळी जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले.  यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्यासह माजी आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सभापती शौकत मुकादम, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, ज्येष्ठ नेते जिल्हा नियोजन मंडळ सदस्य दादा साळवी,  माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, आरपीआय (आठवले गटाचे) प्रदेश संघटक संदेश मोहिते, प्रदेश उपाध्यक्ष सचिन मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. दिशा दाभोळकर, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, उत्तर

#Malshiras पिलीव येथील माजी विद्यार्थांचा सामाजीक उपक्रम राबविण्याचा संकल्प

Image
    महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील १९९५ या वर्षी इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थीयांचा गेट टुगेदर चा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. पिलीव परीसरात  आठवणी ९५  हया माजी विद्यार्थी संघटनेतर्फे गेल्या दहा वर्षापासून पिलीव परीसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. बाहेरगावी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे मित्र दर दिपवाळी सणानिमित्त एकत्र येतात. यावेळी वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणयासाठी प्रत्येक जण काही रक्कम जमा करतात व यातुन विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी हया आठवणी ९५ ग्रुपचे अध्यक्ष प्रा संजय पाटील उपाध्यक्ष नितीन शिंदे, सचिव सचिन गाटे ,तसेच डॉकटर राजेश चोरमले,अन्टीकरपशन चे संतोष मदने,इस्माईल पठाण सर,योगेश विरकर सर,युवा उद्योजक उमेश देशमुख, अविनाश जेऊरकर, विजय ढेरे,प्रगतशील बागायतदार सुर्यकांत मदने,संतोष जाधव ,राहुल झिंजे,संग्राम पाटील, मधु शिंदे,चंद्रशेखर काळे,विजय सपाटे, योगेश शेंडगे, शंकर देशमुख, राणी गुजरे, यावेळी  विविध क्षेत्रात पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.  गोल्डन गर्ल म्हणून राणी गुजरे यां

#Yavat शिंदेवाडी मधील कार्यकर्त्यांचा राहुल कुल यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पारगाव शिंदेवाडी येथील युवक आणि नागरिकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे युवा नेते राजाभाऊ तांबे यांना धक्का मानला जात आहे. राजाभाऊ तांबे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या शिंदेवाडी मधील संभाजी तांबे, कानिफनाथ तांबे, अनिल तांबे, सुनील तांबे, बाळासाहेब तांबे, धनंजय तांबे, संजय शिंदे, लव्हजी काळे, गणेश पन्हाळे, अथर्व तांबे, राज जेधे, संदीप शिंदे ,सोहम भोसले, विजय तांबे, अशोक काळे, संतोष काळे, दीपक काळे, रवी काळे, महेंद्र शिंदे, चंद्रकांत तांबे, सुजल चव्हाण, आदित्य तांबे, नवनाथ काळे, संतोष तांबे या युवकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे . अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मराठा समाजातर्फे रिंगणात असलेले राजाभाऊ तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांना दिला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी या युवकांनी महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्याबरोबर प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने तांबे यांना हा धक्का मानला जात आहे.

#Yavat दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळल्याबद्दल सर्व मित्र पक्षांचे आभार - राहुल कुल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावतीने अधिकृतपणे उमेदवारी अर्ज वीरधवल जगदाळे यांनी दाखल केला होता परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दौंडमध्ये महायुती आता भक्कम स्थितीत असून महायुतीच्या वतीने मी अजित पवार आणि महायुतीतील सर्वच प्रमुख नेत्यांचे आभार व्यक्त करतो असे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी सांगितले आहे. दौंडमध्ये वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीमध्ये आता अधिक भक्कमपणा येणार असून आम्ही या निवडणुकीला ताकतीने सामोरे जाऊ आणि विजय हा आमचा निश्चित असेल असे त्यांनी सांगितले आहे जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राहुल कुल यांनी महायुती मधील सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.

#Latur औसा मतदारसंघातील धनगर, ओबीसी समाज आकाश पुजारींच्या पाठीशी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - धनगर ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आकाश पुजारी हे औसा विधानसभेसाठी एकमेव धनगर उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला आहे. संपूर्ण औसा मतदारसंघातील धनगर ओबीसी बहुजन समाज सत्ता परिवर्तन व्हावे म्हणून आकाश पुजारी यांना निवडून देण्याचे ठरविले आहे अशी चर्चा औसा मतदारसंघात सुरु आहे. याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील आकाश पुजारी यांना मानणारा वर्ग पुजारी यांच्या प्रचारासाठी औसा येथे घोंगडी बैठका घेऊन प्रचार करत आहेत. त्यामुळे निश्चित आकाश पुजारी हे निवडून येणार असल्याचे संकेत आहे. आजपर्यंत आकाश पुजारी यांनी ओबीसो बहुजन समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले आहे. अनेक आंदोलने, उपोषण, लेखणीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समाजपरिवर्तन पुजारी यांनी केले आहे. न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून ओबीसी उमेदवार म्हणून आकाश पुजारी यांना निवडून देऊन यंदा सभागृहात पाठवणार असल्याचे ओबीसी मतदारांनी सांगितले.

#Natepute नातेपुते येथील एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूलला दिल्ली बोर्ड सीबीएसई ची मान्यता

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते तालुका माळशिरस येथील समाजभूषण नानासाहेब देशमुख एज्युकेशन सोसायटी संचलित एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूलची नुकतीच सीबीएसई दिल्ली बोर्ड केंद्रीय पथकाकडुन या स्कूलची इमारत, क्रीडांगण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, डिजिटल वर्ग खोल्यासह गुणवत्तावर्धक सर्व शिक्षण सुविधाची तपासणी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान कोणत्याही त्रुटी आढळून न आल्याने एस. एन.डी. इंटरनॅशनल स्कूलला केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली द्वारा सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रमाला अधिकृत प्रशासकीय मान्यता दिली असुन याबाबतचे पत्र नुकतेच संस्थेला प्राप्त झाले आहे. एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूलला केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्ली द्वारा सीबीएसई मान्यता मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी मुख्याध्यापक संदीप पानसरे, उप - मुख्याध्यापक शकूर पटेल, संस्थेचे पी.आर.ओ. मनोज राऊत व शिक्षक कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी स्कूलचे संस्थापक अध्