#Pune वनाझ परिवार विद्या मंदिर कोथरूड पुणे येथील शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात साजरा
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
पुणे येथील वनाझ परिवार विद्यामंदिर कोथरूड शाळेत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी औक्षण करून उत्साहाने स्वागत करण्यात आले व नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. शाळेचा पहिला दिवस मनोरंजक व्हावा यासाठी विद्यार्थ्यांसोबत गप्पा गाणी गोष्टी घेण्यात आले.
शाळा व शिक्षक तसेच नवीन पुस्तके पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकर्षण म्हणून डोरेमॉन आणला होता. डोरेमॉनने विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
तसेच खास आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे फोटो काढून वर्गाच्या ग्रुप वरती पालकांना पाठवण्यात आले.
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शाळा बघून आनंद व्हावा. म्हणून शाळेमध्ये कार्टून,फुगे, वेगवेगळी चित्रे लावून सजावट करण्यात आली.तसेच बालगीतांच्या स्वरांनी शाळेचा परिसर आनंदमय झाला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
तसेच इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्या व पेन्सिल यांचे वाटप केले तसेच भेटवस्तू देऊन सन्मान केला.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून सुट्टीतील गमतीजमती, धमाल तसेच वेगळे अनुभव याविषयी अभिप्राय घेतले. मा. मुख्याध्यापिका अनिता दारवटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम दिवटे तर आभार सुनीता जपे यांनी मानले.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मा.मुख्याध्यापिका सौ.अनिताताई दारवटकर , उपमुख्याध्यापिका नीता जाधव पर्यवेक्षिका सौ.माया झावरे व कांचन गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समिती प्रमुख सौ.मंदाकिनी लोहार, सौ.अश्विनी चव्हाण, सौ.मंगल थरकुडे यांनी केले.
कार्यक्रमाला सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले..
अशाप्रकारे शाळेचा पहिला दिवस आनंदात पार पडला.
Comments
Post a Comment