मोरोची तालुका माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे शासनाने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे चालू
नसून कर्मचाऱ्यांचे मनमानीपणा सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे शासनाने दिलेल्या वेळेनुसार सुरू ठेवावे तसेच प्रत्यक्ष ड्युटीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती फलकावर लावण्यात यावी औषध विभागांमध्ये आपल्याकडे औषधांचा साठा मागणी ही वेळेत व्हावी.त्या संदर्भात येथील युवक कार्यकर्ते अखिल पाटील तसेच गावातील युवक यांनी आज दिनांक २९ नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन डॉ. सोनाली परतवार डॉ. शिवानी लाड यांनी स्वीकारले.
यावेळी निवेदन देण्यासाठी अखिल सुळ पाटील, सोमनाथ सुळ, दिनेश सूळ, निटवे, दीपक सूळ, स्वप्नील निटवे, संग्राम निटवे, रणजीत झेंडे, शैलेश झेंडे, सुरज गोरे, श्रीराम पवार, अक्षय आवटे, किरण सुळ, हर्षद पवार, प्रेम केंगार, गणेश सोनमळे, राहुल डोंबाळे, सिंधू करचे, गणेश सूळ, मंगेश करचे, योगेश निटवे, किरण गुजले, यश कांबळे, सागर करचे, प्रज्वल झेंडे, सुहास बिरलिंगे, सूरज सूळ, तुषार पाटील, महेश रुपनवर,काकासुळ, संदीप कांबळे यांच्यासह गावातील बहुसंख्य युवक उपस्थित होते.
0 Comments