#Yavat केडगाव येथील सनराईजचे ९० विद्यार्थी अबॅकस स्पर्धेत अव्वल


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, पुणे येथे नुकत्याच अबॅकस उन्हाळी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये पुणे, अहमदनगर व सातारा या जिल्ह्यातील १०७४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये केडगाव व खूटबाव येथील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.


केडगाव येथील सनराईज अबॅकसच्या तब्बल ९० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . मॅन ऑफ द मॅच म्हणजेच त्या दिवसाचे सर्वोत्कृष्ट कमी वेळात १०० गणिते सोडवणारी म्हणून मॅथस मॅजिशियन पुरस्काराने आरती अमोल थोरात या विद्यार्थिनीला सन्मानित करण्यात आले. तिने ३ मिनिट ५ सेकंदात १०० अचूक गणिते सोडवून विक्रम नोंदविला. 

यावेळी सनराईजला महाराष्ट्रातील सर्वात जास्त एनरोलमेंट करणारे सेंटर व जिल्ह्यातील 'बेस्ट सेंटर' म्हणुन सन्मानीत करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र चालक कल्पना नवले, आकांक्षा सरतापे, मोहित कुंभार, भाग्यश्री हंडाळ, श्रद्धा टकले, शितल कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन लाभले.


या परीक्षेत वयोगट व लेव्हल नुसार प्रथम क्रमांक पटकावकेले विदयार्थी: वेदांत सोडनवर, राजवीर दळवी,गार्गी महानोर, देवांश गोलांडे, आदिराज डांगे कार्तिक काटे, राजवीर घोगरे, कार्तिक संघांनी, अन्वी जगताप, गौरी टूले, श्रद्धा  दळवी, आरोही  देशमुख, लुंबिनी यादव, ज्ञानेश्वरी शेळके,काव्या लाड, स्वरा रुपनवर,यशराज कापरे, यश थोरात,आरती थोरात, राजवीर टुले,आयुष  ढेरे, जीविका हिंगणे, श्रुतिका पानसरे,अथर्व  कापरे. व्दितीय क्रमांक पटकावलेले विध्यार्थी खालील प्रमाणे : सार्थक राऊत, नव्या मेमाणे ,अनुश्री भोसले, रुद्र दिवेकर,अखिलेश वाघोले,सिद्धांत शेळके, देवांश शितोळे, ईश्वरी शिंदे,ईश्वरी राऊत, अवनी भांडवलकर, आर्या बारवकर, सिद्धांत शेळके, सेजल इनामदार, आहात तांबोळी, जिया शेलार,अमित धरोलीया, शोएब तांबोळी,अथर्व नरूटे, कृष्णा हिंगणे,जानवी लाड,आराध्या शितोळे, श्रेयश शेलार. तृतीय क्रमांक पटकावलेले विद्यार्थी : तनिष्का भोंडवे, काव्या शेलार, परिणीता भांडवलकर, विराज माळवदकर, अभय शेळके, शार्दुल मोरे, हर्षल सर्जे, रोहित जगताप, आदिती शेळके, पृथ्वीराज जाधव, आदिती देशमुख, सोहम थोरात, शौर्य निवंगुने, राजवीर थोरात, श्रुती थोरात, राजवीर निंबाळकर. प्रो ऍक्टिव्हचे गिरीश करडे, अजय मन्यार, तेजस्विनी सावंत यांनी विद्यार्थी व सेंटरला सन्मानीत केले.

५९ विद्यार्थी पहिल्या तीन क्रमांक मध्ये आले.  ३१ विध्यार्थी ४ था व ५ व्या क्रमांकावर होते. उर्वरित ३४ उत्तेजनार्थ ठरले. स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल परिसरातून विद्यार्थ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम