#Pune किरण शेलार महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित


महादरबार न्यूज नेटवर्क -
मुंबई येथील रुद्रांश फौंडेशन मल्टिपर्पज सोसायटी व सिनेअर्क प्रॉडक्शन यांच्यावतीने कारूंडे (बंगला)  ता. माळशिरस जि. सोलापूर येथील किरण हिरालाल शेलार यांना यावर्षीचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
    
मुंबई येथील रुद्रांश फौंडेशन व सिनेअर्क प्रॉडक्शन यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक,शैक्षणिक साहित्य,पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी व योगदान असलेल्या मान्यवरांचा पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी आयुर्वेदाचार्य किरण हिरालाल शेलार यांना पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोहोळ यांच्या शुभहस्ते व पुणे महानगरपालिकेचे उपआयुक्त युनुस पठाण, इंक्रेडिबल सोशल वर्कर्स ग्रुपचे अध्यक्ष अस्लम बागवान,ज्येष्ठ लेखिका सौ शैलेजाताई मोहोळ, निसार फोंडेशनचे अध्यक्ष हाफिज शेख व रुद्रान्स फौंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ या पुरस्काराने स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

किरण शेलार यांनी गेल्या १० वर्षापासून अनेकांना व्यसनापासून मुक्त केले आहे तसेच ते काविळ या आजारावरती आयुर्वेदिक औषेधही देतात त्यांच्या या औषधांने आजपर्यंत हजारो लोकांना फायदा झाला आहे तसेच त्यांचे समाजसेवेतही योगदान असल्याने त्यांच्या या विविध कार्याची दखल घेऊनच रुद्रांश फौंडेशन मुंबई यांच्यावतीने यावर्षीचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य , कला,पत्रकारिता, समाजसेवा,व्यवसाय व विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांना महाराष्ट्र रत्न २०२४ हा पुरस्कार मान्यवरांचा हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मराठी अभिनेत्री कोमल सावंत यांनी केले तर उपस्थितांचे आभार इतिहास अभ्यासक जयदेव जाधव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम