#Varvand:आमदार राहुल कुल यांची भाजपा जिल्हा समन्वयकपदी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा समन्वयकपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
      
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार राहुल कुल यांची जिल्हा समन्वयक म्हणून दि.४ रोजी निवड करण्यात आली आहे . भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी पुणे जिल्हा ग्रामीण हा संपूर्ण जिल्हा होता. यावर्षीपासून यामध्ये बदल करत दक्षिण व उत्तर असे दोन जिल्हे निर्माण केले आहेत.त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्षांची नेमणुक केली आहे.   यामुळे या दोन्हीही ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे .     यावरून एक प्रकारे आमदार राहुल कुल यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आमदार राहुल कुल यांच्याकडे यापूर्वी बारामती लोकसभा निवडणूकप्रमुख पदाची जबाबदारी असून आत्ता पूर्ण ग्रामीण जिल्ह्याची समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याने जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यामुळे बळ मिळणार आहे.
    
या निवडीबाबत आमदार राहुल कुल यांना विचारले असता ते म्हणाले की , भारतीय जनता पार्टीने माझ्यावर संघटनात्मकरुपी समन्वयाची जबाबदारी दिली असून ही दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पाडणार आहे.केंद्र व राज्य सरकारची विकासाची कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोचविले जातील याबाबत संघटनात्मक रचना करून ही कामे पोहचविली जातील . बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारी नेमणुकी नंतर पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर जिल्हा समन्वयकाची जबाबदारी दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानून त्यांनी दिलेला विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवणार  असल्याचेही  त्यांनी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम