महादरबार न्यूज नेटवर्क -
आळंदी मरकळ रस्त्यावर आळंदी नगरपालिका हद्द व चरोली खुर्द ग्रामपंचायत हद्द यांच्या कात्रीत सापडलेला हा रस्ता गेली अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून, येथे वाहन चालकांना कमालीची कसरत करून, खड्डा पार करावा लागतो, मात्र याकडे तात्पुरती माती वजा मुरूम टाकून तो बुजवला जातो, परंतु काही दिवसातच पुन्हा परिस्थिती जैसे थे होती. गेली आठवडाभर आळंदी मध्ये पाऊस सुरू असून, खड्ड्याची खोली वाढत चालली आहे, त्यामुळे वाहन चालक, व नागरिकांचे कंबरडे या ठिकाणी मोडत आहे, तरी प्रशासनाने हद्दीचा वाद बाजूला ठेवून, कायमस्वरूपी या खड्ड्यावर पेविंग ब्लॉक बसवावेत अशी मागणी अॅड. नाझीम शेख यांनी संबंधितांकडे केली आहे.
फेविंग ब्लॉक ऐवजी या ठिकाणी गतिरोधक बसवला तरी चालेल असेही निवेदनात म्हटले आहे. यापुढे या खड्ड्याचा प्रश्न दोन्ही प्रशासनाने ऐरणीवर न ठेवता सदरील रस्ता सुस्थितीत करून द्यावा अशी ही मागणी नागरिक व वाहन चालक करीत आहेत.
0 Comments