महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते (तालुका माळशिरस) येथील पोस्ट ऑफिस इमारत गेले पन्नास वर्षांची जुनी असून अतिशय जीर्ण झाली आहे ते कधीही नागरिकांच्या अंगावर पडून जीवित हानी होऊ शकते व पोस्ट कर्मचारी नागरिकांना त्या इमारतीपासून धोका आहे. तरी सदर जनहितार्थ निवेदन ची अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ तेथून पोस्ट ऑफिस दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी अण्णा सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री अमित भिंगारदिवे व इतर कार्यकर्ते यांनी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
तसेच नातेपुते सह आजूबाजूच्या खेड्यातून ग्रामस्थ मागणी करत आहेत.
0 Comments