Hot Posts

6/recent/ticker-posts

#Alandi भारतीय जनता पार्टी सरचिटणीस पदी आकाश जोशी


महादरबार न्यूज नेटवर्क -
आकाश जोशी यांची भारतीय जनता पार्टी आळंदी शहर मंडल कार्यकारणी मध्ये सरचिटणीस म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे  अध्यक्ष प्रदीप दादा कंद यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र एका समारंभ प्रसंगी दिले. सदरच्या  नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे की, आपल्यावर आळंदी शहर भाजप मंडल सरचिटणीस पदी नियुक्ती करून आपल्यावर पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देत आहोत,आपण ते कार्य सिद्धीस घेऊन जाल  अशी  अपेक्षा असे पत्रात नमूद करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

आकाश जोशी हे तरुण,तडफदार, उमदे व्यक्तिमत्व असून ते पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments