महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते पोलीस ठाणे मध्ये चोरीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार ,cctv बाबत तपास करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे तब्बल 4,97,000/-रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने फिर्यादीस व मूळ मालकास परत केले त्याचे वर्णन खालील प्रमाणे.
1) गुरन 133/2025 BNS कलम 309(4),3(5) 1)24000/-रुपये किमतीचे 30 मोठे सोन्याच्या मण्याची गळ्यातील पोत
2)24000/-रुपये किमतीचे लहान लहान 92 मन्याची सोन्याची गळ्यातील पोत मालक नामे वैभव विठ्ठल आष्टी रा. माळशिरस
2) गुरनंव- 105/2025 BNS कलम 305(2), 331(4)1) 90000/-रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाची सोन्याची कंठी माळ 2)60000/-रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस 3)30,000/-रुपये किमतीचे10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मिनी गंठण 4)9000/-रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याच्या रिंगा 5)20,000/- रुपये किमतीची 05 ग्रॅम वजनाची पिळ्याची अंगठी 6)20,000/-रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंगा 7)40,000/-सात ग्रॅम वजनाची सोन्याची मनीमाळ 8)10,000/-रोख रक्कम
मालक नामे - रामदास चंद्रकांत पवार रा. नातेपुते
3) गुरन 248/2025. BNS कलम 304(2)1) गुन्ह्यातील 80,000/- रुपये किमतीचे गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मालक नामे मंगल बळभीम अटकले मौजे शेगाव पंढरपूर
2)40,000/- रुपये किमतीचे 05 ग्रॅम वजनाची सोन्याचे गळ्यातील डोरले मालक नामे सानिका रोहन गवळी राहणार सुकोडा ता. जी अकोला.
तसेच 20,000/- रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हे सौ सुनंदा लक्ष्मण सोनवळ रा.नातेपुते यांचे गळ्यातील मंगळसूत्र चोरीस गेले होते त्यांनी पोलीस ठाणे येथे येऊन अर्ज दिल्यानंतर सदर बाबत ते पती पत्नी मूकबधिर आहेत असे समजल्यावर सदर गुन्ह्याचा तपास करून मूळ मालकास त्यांचे मंगळसूत्र परत करण्यात आले.
असे एकूण 4,97000/- रुपयाचे गुण्यातील सोने व रोख रक्कम वरील किमती मुद्देमाल मा. श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मा.प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय श्री संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याच्या भव्य प्रांगणात वरील सर्व गुन्ह्यातील फिर्यादी व मालक यांना बोलावून घेऊन त्यांना सोन्याचे दागिने व रोख रक्कम परत करण्यात आले.
यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी श्री महारुद्र बबन परजणे सो, सहाय्यक पोलीस निरीक्षक पीएसआय विक्रांत दिघे तसेच PN/लोहार,PN/वाघमोडे, HC/जमादार,HC/रुपनवर, HC/गोरे pc/ सोमनाथ मोहिते, अमोल देशमुख, नवनाथ चव्हाण यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांकडून नातेपुते पोलीस ठाण्याचे कौतुक करण्यात येत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments