महादरबार न्यूज नेटवर्क -
पुणे आळंदी रस्त्यावर देहू फाटा ते वाय जंक्शन चौक या ठिकाणी नवीन एसटी स्टँडची मुबलक जागा आहे, येथे गेल्या काही वर्षांपासून मजूर अड्डा स्थापित झाला आहे, या ठिकाणी सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत विविध भागातून येणारे मजूर महिला पुरुष हे आपल्या दिवसभराच्या भाकरीच्या शोधा करिता या ठिकाणी येऊन थांबतात, मात्र पुणे आळंदी व्हाया चाकण हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक अहोरात्र सुरू असते, इथे उभे राहणारे मजूर हे आपल्या जीवाची परवा न करता थेट रस्त्यामध्येच एकजुटीने उभे राहून आपल्या ठेकेदारामार्फत काम शोधण्याचा प्रयत्न करीत असतात.मात्र जर अचानक एखादा अपघात झाला तर अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
तरी आळंदी पोलीस स्टेशन, दिघी पोलीस स्टेशन, व आळंदी नगरपरिषद यांनी संयुक्त रित्या सदरील मजुरांना आत मध्ये असणाऱ्या नवीन एसटी स्टँड च्या जागेत मजुरांना उभे राहण्यास परवानगी द्यावी व रस्त्यावर येणाऱ्या (उभ्या राहणाऱ्या) मजुरांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी वाहनचालक व आळंदीकर नागरिक करीत आहेत. तरी याकडे पोलीस प्रशासनाने अतिशय काळजीने लक्ष देणे गरजेचे आहे.
0 Comments