Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun गाव विकासासाठी एकजूट! शेखर निकम यांच्या कामावर मोहर; फणसवणे परिसरातील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गटात) सामूहिक पक्षप्रवेश

प्रत्येक गावाचा विकास हीच आमची प्राथमिकता - आमदार शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येत फणसवणे गुरववाडी, गराटेवाडी, वणेवाडी, बालदेवाडी, बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गटात)जाहीर प्रवेश केला.

गेल्या पाच वर्षांत आमदार शेखर निकम यांनी आपल्या शांत, संयमी आणि सर्वसमावेशक कार्यशैलीतून गावपातळीवर भरीव विकासकामे केली आहेत. सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे परिसरात विकासाचा नवा ध्यास निर्माण झाला असून, त्याचाच प्रत्यय या प्रवेशातून आला आहे.
या प्रसंगी आमदार निकम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत, “गावाच्या प्रगतीसाठी टप्या टप्याने योजनाबद्ध पद्धतीने कामे केली जातील. विकास हीच आमची प्राथमिकता आहे,” असे आश्वासन दिले.

या सामूहिक प्रवेशावेळी प्रमुख उपस्थितीत गावातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये गावकर (स्थानिक) गणपत गुरव, प्रकाश काजवे (अध्यक्ष, मुंबई), दिलीप कदम (सचिव), मोहन गुरव (उपसरपंच), विजय गुरव (सचिव, मुंबई), पुरुषोत्तम वणे (कार्याध्यक्ष स्थानिक), रविंद्र गराटे (मुंबई), वामन गुरव (मानकरी), बापू गुरव, शिवशंकर वणे, अनंत गुरव, वसंत वणे, राजन गराटे, गणपत गराटे, मोहन बालदे, सिद्धार्थ कदम, सुरेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य विनित गराटे, माधुरी गुरव, वणे, दिनेश वने, दिनेश बालदे, अश्विनी बालदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा प्रवेश म्हणजे केवळ पक्षबदल नव्हे, तर गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Post a Comment

0 Comments