महादरबार न्यूज नेटवर्क -
अधिस्वीकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासात दिली जाणारी पन्नास टक्के सवलत पूर्वीप्रमाणे चालू करा अशी मागणी राज्यसभेचे खासदार अजित जी गोपछडे यांच्याकडे व्हाइस ऑफ मिडिया चे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे सदस्य तथा आपलं नांदेड़ चे संपादक शिवराज पा.गाडीवान, स्वतंत्र प्रजावार्ता (हिंदी) चे संपादक हानमंतु देसाई, दै.विष्णुपुरी एक्सप्रेस चे संपादक मनोज बुंदेले यांनी केली आहे.या संदर्भातले निवेदन खासदार अजित जी गोपछडे यांना धर्माबाद दौऱ्यात आले असता देण्यात आले आहे.
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत दिली जात होती मात्र कोरोना काळापासून ही सवलत केंद्र सरकारने बंद केली आहे तरी पत्रकारांना रेल्वे प्रवासात दिली जाणारी ५०% प्रवास सवलत ही पूर्वीप्रमाणे चालू करावी अशी मागणी करणारा ठराव धर्माबाद येथे व्हाइस ऑफ मिडिया संघटनेच्या कार्यकारिणीत संमत करण्यात आला होता. केंद्रीय पातळीवरून या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात येत असून ही खासदार अजित जी गोपछडे यांना निवेदन देऊन पत्रकारांना दिली जाणारी रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात यावी याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे पत्रकारांना प्रवासात १००% सवलत दिली जाते परंतु काही बसेसला हि सुविधा उपलब्ध नाही यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या तर्फे देण्यात येण्या-या पास वर हि सुविधा सर्व बसेस साठी राहिल याची नोंद व्हावी त्याचबरोबर पत्रकार व त्यांचे जोडीदार व एक अपत्य ला ही १००% सवलत द्यावी अशी मागणी करणारे निवेदन खासदार अजित जी गोपछडे यांना देण्यात आले आहे.
0 Comments