महादरबार न्यूज नेटवर्क - गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने एकलव्य प्रतिष्ठान, आळंदी यांच्या वतीने रविवारी (३१ ऑगस्ट रोजी ) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या सर्व सदस्यांच्या अथक प्रयत्नांतून हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. समाजसेवेचा संकल्प घेऊन आयोजित या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरादरम्यान एकूण ४५ रक्तबॅगचे संकलन करण्यात आले. रक्तसंकलनाचे कार्य पुणे सिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर यांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शिबिरात रक्तदात्यांना योग्य वैद्यकीय सल्ला व प्रमाणपत्र देण्यात आले.
एकलव्य प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक रक्तदात्याचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले. संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या समन्वयातून हा उपक्रम गणेशोत्सवाच्या उत्साहात समाजहिताचा नवा संदेश देणारा ठरला.
स्थानिक पातळीवर मिळालेला प्रतिसाद पाहता प्रतिष्ठानने भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांची मालिका राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे अशी माहिती एकलव्य प्रतिष्ठानचे सदस्य सुरज बोरुंदिया यांनी दिली.
0 Comments