Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pirangut पिरंगुट - भुगाव गटातून विजय मरगळे रिंगणात

महादरबार न्यूज नेटवर्क -

पुणे जिल्हा परिषद पिरंगुट - भुगाव ३६ गट ओबीसी प्रवर्ग राखीव असल्याने या गटातून एक सामान्य शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित युवक विजय मरगळे हे रिंगणात उतरले आहेत.

गेली दहा-बारा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत त्यांचा चांगला दांडगा जनसंपर्क आहे. ते सामान्य जनतेची जाण असलेले व्यक्तिमत्व आहेत.

जिल्हा परिषद पिरंगुट-भूगाव गट-36 यामध्ये मोसे खोरे, मुठा खोरे, पिरंगुट, भूगाव, भूकुम, कासारअंबोली, उरवडे. इत्यादी गावे येत आहेत. जनतेतून विजय मरगळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

वरील गावातील नागरिकांच्या मागणीचा विचार करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

जनसेवक म्हणून काम करणार पारंपारिक घराणेशाही राजकारण थांबविणार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार.

विजय मरगळे युवा नेते

Post a Comment

0 Comments