महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल, माखजन (सरंद) शाळेतील १०वी अ आणि ब वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच गुहागर येथे संपन्न झाला. यानिमित्ताने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत सध्या कोण काय करतोय यावर शालेय सवंगड्यांनी गप्पाटप्पा मारल्या. सलग गेट टुगेदर करण्याचे यंदाचे त्यांचे हे चौथे वर्ष होते.
माखजन इंग्लिश स्कूलने आजवर त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान देऊन व सर्वगुणसंपन्न शिक्षण व संस्कार दिल्याने आज या शाळेतील विद्यार्थी मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. काहीजण कामानिमित्त पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी शहरात जाऊन अर्थार्जन करत आहेत. तर काहीजण गावाकडेच राहून उदरनिर्वाह करत आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या बालपणाच्या सवंगड्यांना एकत्र आणून पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी बालपणीच्या मित्रांनी(दिपक शिगवण , शैलू धामणस्कर, निलेश लाड, उदय सावंत, किशोर सावंत)यांनी पुढाकार घेतला आणि तो प्रत्यक्षात आणत १९९४ - १९९५ सालातील १० वी बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट टूगेदर गुहागर येथे घडवून आणला. हा गेटटुगेदर दि. ३ व ४ जानेवारी रोजी पुष्कर ऍग्रो टुरिझम, गांगराई, गुहागर येथे संपन्न झाला. सदर १९९४-१९९५ सालातील १० वी बॅचच्या विद्यार्थ्यांनी मिळून एक सामाजिक ग्रुप तयार केला आहे. या ग्रुप मार्फत सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी इयता १० वीच्या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. तसेच या ग्रुपमध्ये काही आपत्कालीन समस्या निर्माण झाली तर त्यासाठी फंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यानिमित्ताने बालपणीच्या आठवणी पुन्हा एकदा जागविण्यासाठी मुंबई येथून उदय सावंत, किशोर सावंत, दीपक पवार, विजय जड्यार, महेंद्र सुर्वे, इरफाना पटेल, स्वाती दिंडे, वैशाली भायजे, विनिता गुरव, हेमा चव्हाण, संदिप कारकर, सुरेखा साळवी, सुनील कातकर, दिनेश मोरे, स्मिता कांबळे तर
गावावरून शैलेश धामणस्कर, निलेश लाड, रवींद्र जाधव, दीपक शिगवण, मीनल पाटणकर, मनीषा पेंणकर, तबस्सूम खोत, सुनील घेवडे, सचिन बाष्टे, सचिन कदम, अमित पाटणकर, विनोद शिंदे तसेच पुणे रुपेश सुर्वे, राहूल नेहेते असे एकूण २९ मित्र मंडळी आवर्जून उपस्थित होते.
0 Comments