Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras ​खुळेवाडीत विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


​महादरबार न्यूज नेटवर्क -

खुळेवाडी (ता. माळशिरस) येथे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत पायल शशिकांत रणदिवे (वय २२) हिने (दि. २१ फेब्रुवारी २०२६) रोजी रात्रीच्या सुमारास शनिवारी घरात कोणीही नसताना राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर तिचे वडील, फिर्यादी अंकुश रामचंद्र लोंढे यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीत नमूद केल्यानुसार, पायलचा पती शशिकांत मारुती रणदिवे याने तिला वेळोवेळी मारहाण केली. तसेच, सासरा मारुती दामू रणदिवे, सासू छाया मारुती रणदिवे आणि दीर कैलास मारुती रणदिवे यांनीही घरातील किरकोळ कारणावरून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या सततच्या त्रासामुळे पायलने आत्महत्या केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

फिर्यादी अंकुश लोंढे यांच्या तक्रारीवरून नातेपुते पोलिसांनी पती शशिकांत रणदिवे, सासरा मारुती रणदिवे, सासू छाया रणदिवे आणि दीर कैलास रणदिवे (सर्व रा. खुळेवाडी) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये (कलम १०८, ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५)) गुन्हा दाखल केला आहे. पती, सासू सासरे यांना अटक केली असून दिराचा शोध पोलीस घेत आहेत या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे करत आहेत.

पायल ला ब्युटी पार्लर चालू करायचे होते तसा तिने क्लासही लावला होता. आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या हातावर सुसाईड नोट सविस्तरपणे लिहले होते. "हसू झालंय माझं, माझं पार्लर बंद केले .. जीव होता तो माझा.. स्वप्न होतं ग.. आजपर्यंत शांत बसले पण आता नाही .. चांगल्या आई बापाची लेक आहे म्हणून निघून पण नाही गेले .. माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते .. SORRY", असे पायलच्या सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. आता पोलिसांनी सुरू केला असून पायलच्या शवविच्छेदनानतर मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकणार आहे. या घटनेमुळे नातेपुते परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments