Hot Posts

6/recent/ticker-posts

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी


महादरबार न्यूज नेटवर्क -
पुणे- पंढरपुर मार्गावरील कारूंडे (ता.माळशिरस) येथे पुलावर झालेल्या कार व टेम्पोच्या अपघातात चार जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, लासूर्णे (ता.इंदापूर ) येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते.  ते नातेपुते येथून राॅगसाईडने निघाल्याने हा अपघात कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर घडला.

यामध्ये राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेस शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२), शिवराज विशाल काळे (वय १०) हे जागीच ठार झाले तर या अपघातात आकाश दादा लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Post a Comment

0 Comments