#Solapur:अणदूर - नळदुर्गच्या श्री खंडोबावर पत्रकार सुनील ढेपे यांचे भक्तीगीत रिलीज


महादरबार न्यूज नेटवर्क -          
तुळजापूर तालुक्यातील  अणदूर -  मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील लाखो भाविकांचे कुलदैवत श्री खंडोबावर पत्रकार आणि गीतकार सुनील ढेपे यांनी लिहिलेले 'भक्तांचा महापूर ' हे भक्तीगीत रविवारी रिलीज करण्यात आले.

तुळजापूर तालुक्यात अणदूर आणि  नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही ठिकाणी श्री खंडोबाचे मंदिरे आहेत, परंतु देवाची मूर्ती एकच आहे. श्री खंडोबाचे वास्तव्य अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते. सध्या श्री खंडोबाचे वास्तव्य मैलारपूर ( नळदुर्ग ) येथे असून, दर रविवारी मोठी  यात्रा भरत आहे, त्यास किमान वीस ते तीस हजार भाविक हजेरी लावत आहेत, त्याचबरोबर सहा जानेवारी रोजी महायात्रा भरणार आहे, त्यास किमान पाच लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.

 अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) श्री खंडोबावर पत्रकार आणि गीतकार सुनील ढेपे यांनी आतापर्यंत सात भक्तिगीते लिहिली असून, ' बघा बघा हो, आला हा भक्तांचा  महापूर' हे भक्तीगीत रविवारी रिलीज करण्यात आले. मुक्तरंग म्युझिक कंपनीने हे भक्तीगीत लॉन्च केले आहे. संगीत सचिन अवघडे आणि बापू पवार यांनी दिले आहे तर  संदीप रोकडे यांनी आपल्या दमदार आवाजात गायिले आहे. या भक्तीगीताला खंडोबा भक्तांनी चांगलीच पसंती दिली आहे.

पत्रकार आणि गीतकार सुनील ढेपे यांनी यापूर्वी लिहिलेल्या   नवरी नटली बानाई, देवाचा करार, नळदुर्ग गरजला, श्री खंडोबाची आख्यायिका, खंडोबा डोलतो , स्वप्न पडलंय बानुला आदी भक्तीगीते लोकप्रिय झाली आहेत.

नवीन भक्तीगीत मुक्तरंग म्युझिक या यूट्यूब चॅनलवर https://youtu.be/o4nBr1iXL58  या लिंकवर ऐकावयास मिळणार आहे, असे मुक्तरंग म्युझिक कंपनीच्या संचालिकादीपा  ढेपे यांनी सांगितले. 


Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम