महादरबार न्यूज नेटवर्क -
येथील ज्येष्ठ पत्रकार एम.डी. पाखरे यांचा 63 वा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. प्रथम माऊलीना अभिषेक, येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत धार्मिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला, तद्नंतर येथील भांबुर्डेकर सराफ यांच्या दालनामध्ये प्रथम स्वर्गीय राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजलीवाहून, शिवरायांना अभिवादन करून, श्री गणरायाला वंदन करून व वायफळ खर्चाला फाटा देऊन अत्यंत साधेपने साजरा करण्यात आला. शुक्रवार दि. ६ रोजी तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती, संकष्टी चतुर्थी व याच दिवशी एम.डी. पाखरे यांचा वाढदिवस असा त्रिवेणी संगमाचा योग आज जुळून आला होता, संपूर्ण दिवसभर पाखरे यांच्यावर प्रेम असणाऱ्या सन्माननीय व्यक्तींकडून व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईल दूरध्वनी व इतर माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत प्रथम धार्मिक पद्धतीने वाढदिवस साजरा केला.यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ह. भ. प. मोहन महाराज शिंदे, अनिल जोगदंड, दिनेश कुऱ्हाडे, संभाजी गोरडे, विनायक महामुनी, आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळातील ज्ञानेश्वर भिकू चव्हाण, सचिन शिंदे, वारकरी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तदनंतर येथील कुणाल भांबुर्डेकर सराफ यांच्या दालनामध्ये वाढदिवसाच्या केक कापण्यापूर्वी राज्याचे दिवंगत नेते स्वर्गीय अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून, गणेशाला वंदन करून तसेच शिवरायांना अभिवादन करून अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी निखिल व कुणाल भांबुर्डेकर त्यांचे सर्व सहकारी, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विश्वंभर पाटील, आळंदी शहर काँग्रेस आय कमिटीचे सर्वेसर्वा नंदकुमार वडगावकर, एन. के. टी. ट्रस्टचे विश्वस्त मनोहर दिवाने, अर्जुन मेदनकर, गिरीश जानवेकर, प्रसाद बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments