महादरबार न्यूज नेटवर्क -
टोल संकलन संस्थेचे प्रमुख श्री नीरजकुमार यांच्या वाढदिवसानिमित्त नॅशनल हायवे क्रमांक ९६५ भवानीनगर राजुरी येथे श्री सुनील नथुराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री नितीन पवार, श्री रवी दंडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी भवानीनगर राजुरी तसेच धर्मपुरी सह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले.
यावेळी ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते यांनी रक्त संकलित केले.
यावेळी श्री नितीन पवार, श्री रवी दंडी,विनय मोरानकर यांच्यासह भवानीनगर टोल प्लाजा सर्व कर्मचारी व नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments