#Malshiras:महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा वर्धापन दिन आरोग्य शिबिराने साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
सन्मा राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षनेते दिलीपबापु धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका उपाध्यक्ष रोहित खाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना  गट नं.२ शाखेचा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त २ दिवसाचे आरोग्य शिबिर  आयोजित केले होते. यात महिलांसाठी हिमोग्लोबिन , सर्व प्रकारच्या रक्तातील टेस्ट , मोफत ई- श्रम कार्ड शिबिर ,  तसेच डाँ. सागर निटवे ( MD ) यांच्यामार्फत मोफत पाईल्स , मुतखडा ,यांच्य तपासणी तसेच , पुणे येथिल सुप्रसिद्ध H.P देसाई हाँस्पिटल यांच्या मार्फत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी शिबीर आयोजित केलते या शिबिरास गावकऱ्यांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्धाटन सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे , महाळुंग नगरपंचायत चे नगरसेवक नानासो मुंडफणे , माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे , माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे , सचिव लक्ष्मण नरुटे ,यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाखा प्रमुख आकाश शिंदे राजेंद्र भोसले , रामा धंगेकर , अनिल कांबळे , हनुमंत कांबळे , पृथ्वीराज इंगोले आदिंनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम