#Malshiras:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वेळापुरात रास्ता रोको


वेळापूर -सांगोला मार्ग ३ तास धरला रोखून
महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे
सक्तीची वीज वसुली थांबवावी, शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा व तोडलेली वीज कनेक्शन पूर्ववत करावी या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून या बेमुदत धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर व स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर देशमुख  यांच्या नेतृत्वाखाली वेळापूर ता माळशिरस येथे वेळापूर- सांगोला हा महामार्ग स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांनी तीन तास रोखून धरल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या
वेळापूर पोलीस स्टेशन व अर्धनारीनटेश्वर मंदिराच्या समोर स्वाभिमानीच्या शिलेदारांनी हा रस्ता रोको केला होता या वेळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली यावेळी महावितरणचे अधिकारी मोटे यांनी शेतकऱ्यांना पाच तास वीज पुरवठा करतो असे आश्वासन दिल्याने स्वाभिमानीचे शिलेदार या रस्त्यावरून उठले वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी याठकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.  
यावेळी स्वाभिमानी चे जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, ज्येष्ठ नेते,मगन काळे, प्रा. मदने सर, विधानसभा प्रमुख साहिल आतार, सिराज तांबोळी, आरपीआय चे मिलिंद सरतापे बहुजन मुक्ती पार्टी चे काकासाहेब जाधव, महेंद्र साठे यांनी पाठींबा दिला. यावेळी स्वाभिमानीचे सिराज तांबोळी,सचिन देवकाते,अनिल राचकर, अमरसिंह माने- देशमुख, प्रदीप ठवरे -पाटील, सचिन मदने,डॉ. धनंजय म्हेत्रे, डॉ,भगत बापू कोर्टे, दादा म्हेत्रे,आदीसह शेतकरी बांधव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


पंढरपूर तालुक्यातील युवा शेतकरी सुरज जाधव याने वीज शेतीपंपाची तोडणी केल्यामुळे उभी पिके जळून गेल्याने आत्महत्या केली आहे सरकारने आता तरी भानावर यावे व वसुली थांबवावी शेतकऱ्यांचे दैवत राजू शेट्टी हे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत तरीही सरकारचा याकडे कानाडोळा आहे नक्की सरकारला यातून काय साध्य करावयाचे आहे ? हे जर असेच चालत राहिले तर सर्वसामान्यांबरोबर शेतकऱ्यांच्या ही असंतोषाला सरकारला सामोरे जावे लागेल.
अजित बोरकर, 
माळशिरस तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम