#Chiplun:अणदेरी येथे श्री बाजेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार कार्यक्रम संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
तालुक्यातील अणदेरी गाव येथील ग्रामदेवता श्री बाजेश्वराच्या मंदिराचा जिर्णोध्दार कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेश राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

श्री बाजेश्वर हे अणदेरी गावचे ग्रामदैवत असून येथील लोकांचेच नव्हे तर आसपासच्या परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा देखील भरते. दिवसागणिक भक्तांची वाढणारी गर्दी पाहूनच गावातील ग्रामस्थांनी मंदिराच्या जीर्णद्धाराचा निर्णय घेतला.
     
यावेळी माजी खासदार नीलेश राणे, माजी जिल्हा परिषद सदस्य व रचना होडे, पत्रकार अनघा मगदूम, पूजा निकम, सरपंच दिनेश मालप, स्वप्नील शिंदे, दिनेश मालप, बुधाजी सोलकर, सिताराम मालप, अशोक बेंद्रे, सुबोध सोलकर, विश्राम मालप, बगाराम होडे, बाकू होडे, लक्ष्मण मालप, शांताराम सोलकर, सिताराम पाचकले, विनोद म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य समृद्धी सोलकर, रेश्मा मालप, डॉ. लाठरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत