#Natepute:धर्मपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी संभाजी पाटील , व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत मसुगडे यांची निवड


नूतन सदस्यांचा सत्कार व मिरवणूक

महादरबार न्यूज नेटवर्क - 
धर्मपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २० एप्रिल रोजी पार पडली या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलच्या सर्व म्हणजे १३ जागेवर संभाजी भिमराव पाटील, चंद्रकांत मसुगडे, विष्णू केंजळे, मोहन मोरे, संतोष जैन, हरिचंद्र काटकर, नानासो पाटील, भास्कर झेंडे, महावीर निगडे, भारत राऊत, शशिकला अरुण पाटील, मंगल सोपान माने, सारिका लालासो पाटोळे हे उमेदवार विजयी झाले होते.


विजय उमेदवारांमधून चेअरमन पदी संभाजी पाटील तर  व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत मसुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर चेअरमन व्हाईस चेअरमन व सदस्य व पार्टी प्रमुख यांनी ग्राम दैवतांचे दर्शन घेऊन भाजपाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव सुदाम काटकर यांच्या निवासस्थानी नूतन चेअरमन व सदस्यांचा काटकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला नंतर  पाटोळे वाड्यात सोसायटीचे माजी चेअरमन व माजी सरपंच दिवंगत तानाजीराव पाटोळे यांच्या यांच्या प्रतिमेस नूतन चेअरमन व सदस्य यांच्याा हस्ते पुष्पहार अर्पण करण्याात आला.
 
यावेळी विजयकुमार तानाजीराव पाटोळे, बाजीराव सुदाम काटकर, उत्तम निगडे, बबन पाटील, विजय पाटोळे, प्रकाश मसुगडे, गुलाबराव ठेंगील, उमेश मसुगडे, दादा काटकर, गोरख काटकर, सोसायटीचे सचिव पाटील, नवनाथ पाटोळे आदी उपस्थित सत्कारानंतर गुलालाची उधळण करून विजय सदस्यांची गावातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम