#Varvand:उंडवडी तील विकास कामाचे आमदार राहुल कुल यांच्याकडून उद्घाटन

महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
आमदार राहुल दादा कुल यांच्या शुभहस्ते उंडवडी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ  शनिवार दिनांक १०/९/२२ रोजी  संपन्न झाला उंडवडी गावठाण येथे नळ पाणीपुरवठा योजना, उंडवडी सौंदडवाडी बंदिस्त गटर लाईन भूमीपूजन व ग्रामपंचायत उंडवडी बहुउद्देशीय सभागृह, जि.प. प्राथमिक शाळा भोसलेवाडी इमारत व सांस्कृतिक स्टेज, जि. प. प्राथमिक शाळा उंडवडी इमारत व सांस्कृतिक स्टेज ,उंडवडी गावठाण जलशुद्धीकरण खोली जिल्हा  भोसलेवाडी स्मशानभूमी सुशोभीकरण, पोलीस पाटील कार्यालय या कामांचा लोकार्पण सोहळा आमदार राहुल दादा कुल यांच्या शुभहस्ते पार पडला.
याप्रसंगी उपस्थित विशाल  भोसले महालक्ष्मी उद्योग समूह, शामराव दोरगे उद्योजक, भीमा सहकारी साखर कारखाना संचालक माणिक  कांबळे, मा दिलीप देशमुख सर सरपंच राहू, मा सुभाष बापू यादव उपसरपंच यवत,  रवींद्र होले उपसरपंच लडकतवाडी, तानाजी दिवेकर भाजपा ज्येष्ठ नेते, मा पांडुरंग आखाडे माजी सरपंच कासुर्डी दत्तात्रय आखाडे सदस्य ग्रा पं कासुर्डी  संभाजी नातू सर, उंडवडी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ दीपमलाताई सतीश जाधव ,विद्यमान उपसरपंच श्री विकास सुभाष कांबळे, मैनाताई गुंड ग्रामपंचायत सदस्या उंडवडी, श्रीमती विमल जाधव, सदस्या सुनील नवले सदस्य,पोलीस पाटील राजेंद्र जगताप, मा. तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड, मा. सरपंच विकास सोनवणे, मा. उपसरपंच लक्ष्मण भंडलकर, मा. सरपंच मुरलीधर भोसले, पाणीपुरवठा अध्यक्ष संपत टिळेकर, रवी पांढरे, भिकू कांबळे आणि सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे यांनी केले व आभार उपसरपंच विकास कांबळे यांनी केले

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम