Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:नातेपुते येथे सपोनि प्रवीण संपांगे यांच्या आव्हानाला व्यापारी वर्गातून प्रतिसाद

व्यापाऱ्यांच्या सहभागातून दोन खाजगी सुरक्षारक्षक रात्र गस्तीकरिता पोलिसांच्या मदतीला
       

महादरबार न्यूज नेटवर्क -  

नातेपुते पोलीस स्टेशनचे नूतन सपोनि प्रवीण संपांगे यांनी चार्ज  घेतल्यानंतर चोरीच्या घटनेबाबत नातेपुते सह नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आसपासच्या  गावाची सुरक्षेच्या दृष्टीने माहिती घेतली व व्यापारी वर्गांची एक सप्टेंबर रोजी बैठक घेऊन सदर बैठकीमध्ये व्यापारी वर्गांच्या सहभागातून खाजगी सुरक्षा रक्षक नेमणे विषय चर्चा झाली व नऊ सप्टेंबर पासून नातेपुते शहरात

दोन खाजगी सुरक्षा रक्षक हे रात्रगस्तकरीता नातेपुते पोलिसांना मिळालेले आहेत.

सदर सुरक्षा रक्षक हे दिनांक ९ सप्टेंबर  पासून रोज रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत कार्यरत झाले आहेत नातेपुते पोलीस स्टेशनला मनुष्यबळ कमी असतानाही पोलीस कर्मचारी आपापले काम करीत आहेत तरीपण चोरीच्या  प्रमाणात घट व्हावी या दृष्टीने सपोनि संपांगे यांच्या आव्हानाला व्यापारी वर्गातून प्रतिसाद मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments