#Malshiras:माळशिरस येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
तहसील कार्यालय माळशिरस, अखिल भारतीय ग्राहक पंचायत माळशिरस तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी स्वामी विवेकानंद यांची  प्रतिमा पूजन पुरवठा अधिकारी चंद्रकांत लोखंडे,सुशांत केमकर,ग्राहक संरक्षण परिषद सोलापूर चे अशासकीय सदस्य श्रीकांत बाविस्कर व आखील भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष उपेंद्र केसकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपेंद्र केसकर,डॉ.दत्तात्रय थोरात,भगवान घुगरदरे यांनी ग्राहक चळवळीची माहिती दिली.उपेंद्र केसकर यांनी नवीन ग्राहक कायदा व ग्राहक चळवळ २०१९ अंतर्गत सुरक्षितता, माहिती अधिकार, निवड करण्याचा हक्क,म्हणणे मांडण्याचा हक्क,तक्रार निवारण हक्क व ग्राहक सजगता याविषयी माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात श्रीकांत बाविस्कर यांनी महावितरण तक्रार निवारण बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी तालुका संघटक अमित पुंज,उपाध्यक्ष वामनराव वाघमोडे,सचिन पवार,सचिन इंगळे,धोंडीराम म्हस्के, पत्रकार संजय हुलगे,मजहर मनेरी,अमीर तांबोळी,धाईंजे सर, इ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महादेव भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन उपेंद्र केसकर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम