#Chiplun:दिनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व चिपळूण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन


महादरबार न्यूज नेटवर्क  - विलास गुरव 
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (DAY-NULM), चिपळूण नगर परिषद, चिपळूण अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचत गट, वस्तीस्तर संघ, शहर स्तर संघ यांचे करीता  लिंग-आधारित हिंसेबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

केंद्र व राज्य शासनाच्या लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या नयी चेतना : पहल बदल की या करीता दि. १५ नोव्हेंबर २०२२ ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात आला, या अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (DAY-NULM), चिपळूण नगर परिषद, चिपळूण मार्फत खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमाचे स्वागत सौ. दिक्षा दिपक माने, सहयोगीनी, माविम व श्रीम. प्रज्ञा दिपक गमरे, समुदाय संघटक यांनी केले.
१) कार्यशाळा :  मा. बाळासाहेब ठाकरे शॉपींग सेंटर (L टाईप शॉपिंग सेंटर), मार्कंडी, चिपळूण येथे कार्यशाळा घेण्यात आली.
लिंग-आधारित हिंसेबाबत आधारीत लिंग -आधारित हिंसा, POSH कायदा,  या बाबत ॲड.  स्मिता कदम यांनी मार्गदर्शन केले, तसेच लिंग समानता या विषयी श्री.अशफाक गारदी, शहर अभियान व्यवस्थापक यांनी माहिती दिली.
२ ) लिंगभाव समानता प्रतिज्ञा : मा. बाळासाहेब ठाकरे शॉपींग सेंटर (L टाईप शॉपिंग सेंटर), मार्कंडी, चिपळूण येथे प्रतिज्ञा घेण्यात आली.
   यावेळी चिपळूण शहरातील बचत गट, वस्तीस्तर संघ, शहर स्तर संघ यांचे एकुण १०० सदस्यांनी लिंगभाव समानता प्रतिज्ञा  घेतली.

या कार्यक्रमासाठी नवनिर्मीती शहर स्तर संघ, CLF चिपळूणच्या, सौ. उषा अशोक पवार, अध्यक्ष, सौ. रंजिता अजित ओतारी, उपाध्यक्ष, सौ. नेहा महेश गुढेकर,  सचिव, शहरातील सर्व वस्ती स्तर संघ, बचत गटांचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. दिक्षा दिपक माने, सहयोगीनी, माविम, सीएमआरसी, खेड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वस्तीस्तर संघ,शहर स्तर संघ सदस्य, सौ. भारती विचारे, सहयोगीनी, माविम, सीएमआरसी, खेड यांनी विशेष प्रयत्न केले.
3) लिंग-आधारित हिंसेबाबत मेणबत्ती रॅली : मार्गे चिपळूण नगर परिषद ते नाथ पै चौक व एकेरी वाहतूक मार्गे खेडेकर  क्रिडा संकुल.
    लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या दृष्टीने मेणबत्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चिपळूण शहरातील बचत गट ,वस्तीस्तर संघ, शहर स्तर संघ यांचे एकुण २०० सदस्यांनी सहभाग नोंदवीला, लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या घोषणा देत संपूर्ण चिपळूण बाजारपेठेतुन ही रॅली काढण्यात आली.
     श्री. अण्णा साहेब  खेडेकर क्रिडा संकुल येथे मेनबत्ती   प्रज्वलन करून लिंग आधारित हिंसेमध्ये बळी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहून मेणबत्ती रॅलीचा समारोप करण्यात आला.
   
या कार्यक्रमासाठी चिपळूण नगर परिषदेचे मा. श्री. प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, यांनी प्रेरित केले तसेच श्री. प्रमोद ठसाळे, प्रशासकीय अधिकारी, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनीही सहभाग  नोंदवीला. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता शहरातील सर्व बचत गट,  वस्तीस्तर संघ आणि नवनिर्मीती शहर स्तर संघाचे सर्व सदस्यांनी तसेच माविम, सीएमआरसी, खेड DAY-NULM अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले.



Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम