#Chiplun:आगवे ग्रामपंचायत सभागृहाचे उद्घाटन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या उपस्थित पार पडले


महादरबार न्यूज नेटवर्क  -   
चिपळूण तालुक्यातील आगवे गावात ग्रामपंचायत इमारतीवर असणा-या जागेत सभागृह व्हावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती जेणेकरुन ग्रामपंचायत मध्ये होणा-या सभा व इतर कार्यक्रमास पुरेशी जागा उपलब्ध व्हावी. १५ वित्त आयोग व ग्रामपंचायत फंड याचा वापर करुन येथे नवीन ग्रामपंचायत सभागृह बांधण्यात आला त्याचे उद्घाटन आमदार शेखर निकम सर यांच्या उपस्थित पार पडले.

आमदार शेखर निकम  यांनी गाव विकास दृष्टीने मार्गदर्शनपर भाषण करताना ग्रामस्थांनी मागणी केलेल्या विकास कामांबाबत पाणी योजना, व्यायाम शाळा, रस्ते हि कामे विविध योजनेतुन पुर्ण करण्याबाबत ग्रामस्थांना अश्वासीत केले.

यावेळी भुवड सर, पूजा निकम, सिताराम कदम, जयंत घडशी (सरपंच), अनिकेत भंडारी (उपसरपंच), श्रीराम हुमणे (तंटामुक्ती अध्यक्ष), वसंत चव्हाण (पोलीस पाटील), भागवत (ग्रामसेवक), सोनाली चव्हाण, स्नेहा राणीम, शशिकांत राणीम, भुवड सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, अशा सेविका व गावातील गावकरी मंडळी इ. उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम