महादरबार न्यूज नेटवर्क - कळंब / वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयाच्या 1991-92 ते 1992-93 व कळंब काॅलेजच्या 93-94, 94-95, 95-96 सध्याचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या कला शाखेच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थींनीचा स्नेह सोहळा समारंभ रविवार, दि. 29 जानेवारी रोजी कळंब ( वालचंदनगर ) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बळीराजा सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
स्नेह सोहळा समारंभात सकाळी 9 ते 10 स्वागत व फोटो शुट , 10 ते 10.30 चहा व नाष्टा, 10.30 ते 12 ओळख व प्रमुख अतिथींचे मनोगत, दुपारी 12.30 ते 1.30 स्नहभोजन, 2 ते 4 मुक्त संवाद, स्मरण चिन्ह वितरण व आभार, 4 ते 5 शाळा व महाविद्यालय भेट व निरोप याप्रमाणे समारंभाची रूपरेषा असल्याचे व सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments