#Natepute:बाळासाहेबांची शिवसेना माळशिरस तालुका यांच्यावतीने राजमाता जिजाऊ आईसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त अभिवादन

जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मुलींच्या संघाचा केला सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क -
फडतरी तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडतरी येथे बाळासाहेबांची शिवसेना माळशिरस तालुका अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील तसेच त्यांचे सहकारी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडतरी मोठा गट (मुली) यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये  प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्या पूर्ण टीमचे प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्या शाळेमधील एका विद्यार्थिनीचा तालुका चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिचे हे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती राजकुमार हिवरकर पाटील , दादा मुलाणी , जावेद मुलाणी , पोपट शिंदे ,  शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम