#Natepte:बाळासाहेब कर्चे यांची तलाठी पदी निवड झाल्याने पत्रकार संघटनेच्या वतीने सन्मान
महादरबार न्यूज नेटवर्क -
पिंपरी ता. माळशिरस येथील पत्रकार म्हणून ओळख असणारे व सामाजिक कार्याची आवड असणारे सांप्रदायिक कार्यात हिरारीने भाग घेणारे पिंपरी गावचे सुपुत्र बाळासाहेब एकनाथ करचे यांची नुकतीच सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात तलाठी म्हणून नियुक्ती झाली असल्याने नातेपुते येथे ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल माळशिरस तालुका या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पत्रकार श्रीकांत बाविस्कर , माळशिरस तालुकाध्यक्ष शोभा वाघमोडे, तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी पत्रकार मनोज राऊत, विलास भोसले, हनुमंत माने, संजय पवार, विनायक सावंत, सुनील ढोबळे, वैभव आठवले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
बाळासाहेब कर्चे यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक नामांकित दैनिकात काम करून जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले त्यांच्या लेखणीतही हातखंड आहे माळशिरस तालुक्यात एक प्रामाणिक व मार्गदर्शक पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांची तलाठी पदी निवड झाल्याचे समजताच नातेपुते सह परिसरातील पत्रकारा मध्ये आनंद आणि अभिमान वाटत आहे त्याचाच एक भाग म्हणून नातेपुते मध्ये त्यांचा पत्रकारा संघातर्फे सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार श्रीकांत बाविस्कर, मनोज राऊत, विलास भोसले, विनायक सावंत, सुनील ढोबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Comments
Post a Comment