#Natepute:राजकूमार हिवरकर पाटील यांच्या प्रयत्नातून माझ्या मुलाचे ऑपरेशन सफल झाले - प्रदीप मोरे


महादरबार न्यूज नेटवर्क -
शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील  यांचा प्रयत्न आमच्यासाठी सफल ठरला.आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचा शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचविण्याचा संकल्प शिवसेना नेते शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या माध्यमातून पोहोचवीत आहेत.माझा मुलगा शुभम प्रदीप मोरे रा.मांडवे ता.माळशिरस वय २० वर्ष घरच्या गोठ्याच्या छतावरून खाली पडून गुडघ्यास दुखापत होऊन गुडघ्या मधील मज्जातंतू तुटले.त्याचे ऑपरेशन शासनाच्या योजनेतून मोफत होण्याचा लाभ मिळविण्यासाठी मुलाचे रेशन कार्ड मध्ये नाव नव्हते.राजकुमार हिवरकर  यांनी तहसील कार्यालयातून दोन तासाच्या आत रेशन कार्ड मध्ये मुलाचे नाव नोंदवून दिले.त्यांच्या सहकार्याच्या भावनेने कोठेही अडवणूक झाली नाही.त्यामुळे त्याला तात्काळ आरोग्य योजनेचा लाभ मिळवून दिला.खाजगी रुग्णालयांमध्ये अडीच लाखांपर्यंतचा येणारा खर्च शासकीय योजनेतून बसवून एकही रुपाया खर्च न होता.अकलूज येथील डाॅ.सूर्यवंशी यांच्या रुग्णालयात मुलाचे मोफत ऑपरेशन झाले राजकूमार हिवरकर  आमच्यासाठी देव ठरले असल्याची प्रतिक्रिया वडील प्रदीप मोरे रा.मांडवे यांनी व्यक्त केली.

शुभम मोरे याची शस्त्रक्रिया व्यवस्थित होऊन रुग्णालयातून सुखरूप घरी पोहोचल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर ,नातेपुते शहर उपप्रमुख पोपटराव शिंदे,शिवसेनेचे गणेश साबळे पळसमंडळ,माऊली रुपनवर रुग्णाच्या घरी जाऊन त्याची विचारपूस करून आरोग्याची काळजी घेण्याचा तसेच या पुढील कालावधीत उपचाराची आवश्यकता भासल्यास मदतीसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत